HPCL Recruitment 2022 : तरुणांसाठी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) नं ग्रेड C पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 186 पदांसाठी अर्ज मागवले आहेत.  या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 22 एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. अधिसूचनेत दिलेल्या अटी शर्तींनुसार, पात्र असणारे उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे आहे. विशेष म्हणजे, ऑनलाईन अर्जांसोबतच इच्छुक उमेदवार ऑफलाइन अर्जही करू शकतात. अधिकृत वेबसाइट hindustanpetroleum.com वर जाऊन उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.


वेतन 


हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये (Hindustan Petroleum Corporation Limited) 186 पदांसाठीच्या भरतीमध्ये निवड झाल्यावर उमेदवारांना 26,000 ते 76,000 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल. 


पात्रता


अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमधील डिप्लोमा किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेला असावा. तसेच, SC, ST आणि भिन्न-अपंग उमेदवारांसाठी, किमान गुणांची मर्यादा 50 टक्के आहे. उच्च पात्रता (अभियांत्रिकी पदवी किंवा AMIE) असलेले उमेदवार अर्ज करू शकणार नाहीत.


वयोमर्यादा 


इच्छुक उमेदवारांचं वय 1 एप्रिल 2022 रोजी 18 वर्षांहून कमी आणि 25 वर्षांपेक्षा अधिक नसावं. अनुसूचित जाती/अनुसूचित जमातींसाठी किमान वयोमर्यादा 5 वर्षे आणि OBC-NC/Ex-Servicemen/PWBD उमेदवारांसाठी 3 वर्ष शिथिल करण्यात आली आहे.


अर्ज शुल्क 


अर्ज शुल्काबाबत बोलायचं झाल्यास, सामान्य श्रेणी, ओबीसी-एनसी आणि ईडब्ल्यूएससाठी अर्ज शुल्क 590 रुपये आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांगांसाठी अर्ज विनामूल्य आहे.


असा करा अर्ज 


उच्छुक उमेदवार ऑफिशिअल वेबसाईटवर भेट द्यावी.
त्यानंतर करिअर सेक्शनवर क्लिक करा. 
विशाख रिफायनरी तंत्रज्ञ भरती लिंकसाठी क्लिक करा.
त्यानंतर  ड्रॉप डाउनमध्ये देण्यात आलेल्या लिंकवरुन उमेदवार भरती नोटिफिकेशन डाऊनलोड करा.
आता ऑनलाईन अर्ज करण्याच्या पेजवर क्लिक करा.
भरलेल्या अर्जाची प्रिंट घ्या.
भरलेल्या अर्जाची प्रिंट घेऊन अधिकृत पत्त्यावर पाठवा. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI