Railway Recruitment 2022 : कोकण रेल्वेत परीक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 'या' दिवशी वॉक-इन-इंटरव्यू
Railway Recruitment 2022 : कोकण रेल्वेत परीक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर लगेच अर्ज करा.
Railway Recruitment 2022 : जर तुम्ही नोकरी शोधत असाल आणि रेल्वेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल, तर तुमच्यासाठी एका आनंदाची बातमी. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited) ने वरिष्ठ आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. मुलाखतीच्या आधारे या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. 11, 13 आणि 14 मे रोजी जम्मू-काश्मीरमध्ये मुलाखती होणार आहेत. याद्वारे एकूण 14 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. सर्व उमेदवार विहित पत्त्यावर त्यांचे अर्ज आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. पात्र उमेदवार 11 मे आणि 13 मे, 14 मे 2022 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. रेल्वेच्या मते, नोंदणी फक्त मुलाखतीच्या तारखेला सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 या वेळेत करता येईल.
जाणून घ्या किती पदं रिक्त असतील
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये एकूण 14 रिक्त पदांची भरती केली जाईल. ज्यामध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल) च्या 7 आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल) च्या 7 पदांचा समावेश आहे.
वेतन किती?
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 30,000 रुपये आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी 35,000 रुपये प्रति महिना वेतन मिळेल.
शैक्षणिक पात्रता
तांत्रिक सहाय्यकाच्या या पदांच्या भरतीसाठी, उमेदवारानं मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून किमान 60% गुणांसह संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी असणं आवश्यक आहे. याशिवाय वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी उमेदवाराचं कमाल वय 30 वर्ष आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी 25 वर्ष निश्चित करण्यात आलं आहे. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
वॉक-इन-इंटरव्ह्यू कुठे होणार?
या भरतीसाठीची मुलाखत यूएसबीएलआर प्रकल्प मुख्यालय, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सत्यम कॉम्प्लेक्स, मार्बल मार्केट, एक्स्टेंन- त्रिकुटा नगर, जम्मू, जम्मू आणि काश्मीर (UT) पिनकोड - 180011 येथे होणार आहे. त्याच वेळी, उमेदवारांना वेळेवर पोहोचावं लागेल आणि नियुक्त KRCL अधिकाऱ्यासोबत मुलाखतीसाठी नोंदणी करावी लागेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- RECPDCL Jobs : कार्यकारी पदांसाठी 'या' ठिकाणी बंपर भरती; मुलाखतीतून होणार निवड
- Indian Navy Jobs 2022 : भारतीय नौदलात नोकरीची संधी; कोणत्या पदांसाठी, किती वेतन मिळणार? जाणून घ्या
- Job Majha : महावितरण आणि महानिर्मितीमध्ये नोकरी संधी; जाणून घ्या भरतीबाबत सर्व माहिती
- HPCL Recruitment 2022 : हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये बंपर भरती, प्रतिमाह 26 ते 76 हजार कमावण्याची संधी