एक्स्प्लोर

इंटरव्यू, ट्रेनिंग अन् फायनल एग्जाम; अयोध्येत रामललाच्या सेवेसाठी पुजाऱ्यांची नियुक्ती, जाणून घ्या संपूर्ण भरती प्रक्रिया

Ayodhya Ram Mandir Priest: अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या सेवेसाठी देशभरातील तब्बल 3 हजार वेदार्थ्यांमधून काहीचीं निवड करण्यात आली आहे. सध्या त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे.

Process of Priest Selection For Ram Mandir: अयोध्येतील (Ayodhya) भव्य राम मंदिरात (Ram Mandir) 22 जानेवारीला रामललाचा भव्य अभिषेक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील नामांकित व्यक्तींना आमंत्रण पाठवण्यात आली आहेत. पण, त्यापूर्वी रामललाची सेवा करण्यासाठी पुजारी नियुक्त करण्यात आले. त्यासाठी मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली. या भरती प्रक्रियेसाठी देशभरातून 3000 वेदार्थी आणि पुजारी (Ram Mandir Priest) यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून काहींची अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू रामाची सेवा करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. आता निवड झालेल्या अर्चकांना 6 महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जाणार असून प्रशिक्षण प्रणाली सुरू करण्यात आली आहे. 

अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या सेवेसाठी देशभरातील तब्बल 3 हजार वेदार्थ्यांमधून काहीचीं निवड करण्यात आली आहे. सध्या त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे. पुजारी पदांसाठी अर्ज केलेल्यांपैकी 24 अर्चकांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी 21 अर्चकांचं प्रशिक्षण सुरू झालं आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितलं की, निवड करण्यात आलेल्या अर्चकांचं प्रशिक्षण अजुनही सुरू आहे. सर्व अर्चकांना सहा महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. प्रशिक्षणानंतर, परीक्षा घेतली जाईल आणि त्यानंतर सर्वात योग्य व्यक्तींची रामललाच्या सेवेसाठी नियुक्ती केली जाईल. सध्या 21 जण केवळ प्रशिक्षणासाठी आले आहेत. 

प्रशिक्षणादरम्यान, प्रत्येक उमेदवाराला दरमहा 2,000 रुपये दिले जाणार आहेत. 22 जानेवारी 2024 रोजी रामललाचा भव्य अभिषेक सोहळा पार पडणार आहे. अभिषेक झाल्यानंतर श्री रामजन्मभूमी मंदिरातील विधी आणि पूजेचं स्वरूप बदलणार आहे. 22 जानेवारीला रामललाला तात्पुरत्या मंदिरातून भव्य मंदिरात हलवण्यात येणार आहे.

मंदिरात रामललाची पूजा करण्यासाठी गुणवत्तेच्या आधारावर अर्चकांची (पुजारी) निवड केली जात आहे. प्रत्येक मंदिरात दोन पुजारी नियुक्त केले जातील, जे 8 तासांच्या शिफ्टमध्ये सेवा देतील. याशिवाय भंडारी कोठारी आणि सेवादारही असतील.

रामललाच्या सेवेसाठी मोहित पांडेंची नियुक्ती 

मोहित पांडे यांनी गाझियाबाद येथील दुधेश्वर वेद विद्यापीठात सात वर्ष शिक्षण घेतलं आहे. यासोबतच, त्यांनी तिरुपती येथील तिरुमला तिरुपती देवस्थानमशी संलग्न असलेल्या श्री व्यंकटेश्वर वैदिक विद्यापीठातून शास्त्री पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर 2023 मध्ये मोहितनं सामवेदाचा अभ्यास करून पदव्युत्तर पदवी मिळवली. ते रामानंदीय परंपरेचेही अभ्यासक आहेत. मोहित पांडे यांचं वेद, शास्त्र आणि संस्कृतमध्ये प्राविण्य आहे. मोहित पांडे यांनी गाझियाबाद येथील दूधेश्वर विद्यापीठातील दूधेश्वर नाथ मठ महादेव मंदिराचे महंत श्री महंत नारायण गिरी महाराज, पंच दशनम जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते, दिल्ली संत महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संयुक्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष श्री महंत नारायण गिरी महाराज यांच्या देखरेखीखाली विद्येचं शिक्षण घेतलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget