(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Police Recruitment: मुंबई पोलीस दलात कंत्राटी पोलिसांची भरती, तीन हजार पदं भरली जाणार, गृह खात्याचा निर्णय
Mumbai Police Recruitment: मुंबईत 3,००० कंत्राटी पोलीस भरती केली जाणार असून मनुष्यबळाची टंचाई असल्यानं गृह खात्यानं हा निर्णय घेतला आहे.
Mumbai Police Force Contract Recruitment: मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती (Mumbai Police Force Contract Recruitment 2023) करण्याचा निर्णय गृह खात्यानं घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत (Maharashtra State Security Corporation) कंत्राटी पद्धतीनं (Contract Method) जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असून, नवीन भरती होईपर्यंत पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागानं (Maharashtra State Home Department) हा निर्णय घेतला आहे. या कंत्राटी पोलिसांच्या पगारासाठी 30 कोटी रुपये खर्चासही सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबई पोलीस दलात कंत्राटी भरती केली जाणार आहे. मनुष्यबळाची टंचाई असल्यानं तब्बल 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याच्या वतीनं घेण्यात आला आहे. त्यासाठी गृहखात्याकडून 30 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलात कंत्राटी पद्धतीनं भरण्यात आलेल्या पदांवर घेण्यात आलेल्या पोलिसांच्या पगारासाठी 30 कोटींच्या खर्चाला सरकारकडून मंजुरीही देण्यात आली आहे.
11 महिन्यांसाठीच भरती
मुंबई पोलीस दलात सध्या मनुष्यबळाची टंचाई असून नवी भरती प्रक्रिया होईपर्यंत कंत्राटी भरती करण्यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी विनंती केली होती. मुंबई पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर गृह विभागानं कंत्राटी भरती करण्यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. कंत्राटी पद्धतीनं भरती झालेल्या पोलिसांच्या पगारासाठी तब्बल 30 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
राज्य सुरक्षा महामंडळांच्या जवानांतून मुंबई पोलीस दलात कंत्राटी भरती
गणेशोत्सव झाला असला तरीदेखील नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात मुंबईत बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते. याच पार्श्वभूमीवर राज्य सुरक्षा महामंडळांच्या जवानांतून मुंबई पोलीस दलात कंत्राटी भरती केली जाणार आहे. 11 महिने किंवा भरती होण्यापर्यंतचा कालावधी यातील जो कमी कलावधी असेल तेवढ्या काळापुरती ही भरती राहणार आहे. मुंबई पोलीस दलातील कंत्राट संपलं की, सुरक्षा महामंडळाचे जवान पुन्हा आपल्या पूर्वीच्या सेवेत रूजू होतील. यासाठी 100 कोटी 21 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, पोलिसांच्या पगारासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ : Mumbai Police Contract Bharati : मुंबई पोलिसात कंत्राटी भरती सुरु, 3 हजार पोलिसांच्या भरतीचा निर्णय