Job Majha : मुंबई पोर्ट ट्रस्ट, DCSEM मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, वाचा संपूर्ण माहिती
Job Majha: नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आली आहे. भरती कुठे आहे आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती....
Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
शिक्षण क्षेत्रासंबधी काही नोकऱ्या सध्या उपलब्ध असून दादरा नगर हवेली शिक्षण संचालनालयात नोकरीची संधी आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज कुठे करायचा आणि त्यासाठी पात्रता काय आहे याची माहिती खालीलप्रमाणे...
>> DCSEM (Directorate of Construction, Services and Estate Management)
पोस्ट – तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता – B.E./B.Tech इंजिनिअरिंग, डिप्लोमा इंजिनिअरिंग (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
एकूण जागा - ३३
अर्ज पाठवण्याचा पत्ता - सहाय्यक कार्मिक अधिकारी, भर्ती विभाग, निर्माण, सेवा एवं संपदा प्रबंध निदेशालय, दुसरा मजला, विक्रम साराभाई भवन, अणुशक्तीनगर, मुंबई – ४०० ०९४
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ एप्रिल २०२२
तपशील - dcsem.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment मध्ये advertisement वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
>>मुंबई पोर्ट ट्रस्ट
पोस्ट – उपमुख्य अभियंता (Deputy Chief Engineer)
शैक्षणिक पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी (civil engineering degree)
एकूण जागा – ७
नोकरीचं ठिकाण – मुंबई
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
मुलाखतीचं ठिकाण - सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ एप्रिल २०२२
तपशील - www.mumbaiport.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर media मध्य़े vacancy वर क्लिक करा. Advertisement वर क्लिक केल्यावर सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
>> बामर लॉरी एंड कंपनी लिमिटेड मुंबई
पोस्ट – व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता –MBA/ इंजिनिअरिंग पदवी/ पदवीधर
एकूण जागा – ७
वयोमर्यादा – व्यवस्थापक पदासाठी ३८ वर्षांपर्यंत, उपव्यवस्थापक पदासाठी ३५ वर्षांपर्यंत, सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी ३२ वर्षांपर्यंत
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ एप्रिल २०२२
तपशील - www.balmerlawrie.com (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये view all वर क्लिक करा. त्यात तुम्हाला तिन्ही पोस्टची माहिती दिसेल. प्रत्येक पोस्टची view file करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
>> वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
पोस्ट – शिक्षक सहयोगी
शैक्षणिक पात्रता – M.Sc (Agri) or Ph.D.(Agri)
एकूण जागा – ४
अर्ज पाठवण्याचा पत्ता - पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, परभणी
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ एप्रिल २०२२
तपशील - www.vnmkv.ac.in (या वेबसाईटवर गेल्यावर advertisement वर क्लिक करा. Notification for appointment of Teaching Associate (AHDS) या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)