Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


शिक्षण क्षेत्रासंबधी काही नोकऱ्या सध्या उपलब्ध असून दादरा नगर हवेली शिक्षण संचालनालयात नोकरीची संधी आहे.  त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज कुठे करायचा आणि त्यासाठी पात्रता काय आहे याची माहिती खालीलप्रमाणे...


दादरा नगर हवेली शिक्षण संचालनालय


विविध पदांसाठी एकूण 184 जागांसाठी भरती निघाली आहे.


पोस्ट - सहाय्यक शिक्षक (प्राथमिक शाळा)


शैक्षणिक पात्रता - 12वी पास आणि प्राथमिक शिक्षणात 2 वर्षांचा डिप्लोमा


एकूण जागा – 128


वयोमर्यादा – 90 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2022


तपशील - daman.nic.in


 


पोस्ट - उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक


शैक्षणिक पात्रता - B.A./BSC/B.Com.


एकूण जागा – 48


वयोमर्यादा – 30 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2022


तपशील - https://daman.nic.in/


 


पोस्ट – ब्लॉक, ECCE, संसाधन व्यक्ती


शैक्षणिक पात्रता - ब्लॉक संसाधन व्यक्तीसाठी B.A./BSC/B.Com. आणि ECCE, संसाधन व्यक्ती पदासाठी पदवीधर ही पात्रता हवी.


एकूण जागा – 6 (यात ब्लॉक संसाधन व्यक्ती पदासाठी १ जागा, ECCE संसाधन व्यक्ती पदासाठी 4 जागा आणि संसाधन व्यक्ती पदासाठी 1 जागा आहे.)


वयोमर्यादा – 30 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2022


तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.


अर्ज पाठवण्याचा पत्ता - शिक्षण संचालनालय, फोर्ट एरिया, मोती दमण किंवा डीएनएच जिल्हा शिक्षण कार्यालय, सचिवालय, सिल्वासा


तपशील - https://daman.nic.in/  (या वेबसाईटवर गेल्यावर jobs & vacancies वर क्लिक करा. Job advertisement published for Daman यावर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


याशिवाय मुंबई उच्च न्यायालयात देखील वाहनचालकाच्या पोस्टसाठी नोकरी उपलब्ध आहे.


शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण, मराठी आणि हिंदी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहे, हलके मोटार वाहन चालवण्याचा परवाना, किमान 3 वर्षांचा हलके किंवा जड मोटर वाहन चालवण्याचा अनुभव असावा.


एकूण जागा – 8


वयोमर्यादा – 21 ते 38 वर्ष


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 एप्रिल 2022


तपशील - www.bombayhighcourt.nic.in  (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment वर क्लिक करा. Recruitment for the post of Staff Car Driver on the establishment of the High Court of Judicature at Bombay. या लिंकमधल्या advertisement वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha