Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

इंडियन बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे या ठिकाणी नोकरीची संधी आहे.  त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज कुठे करायचा आणि त्यासाठी पात्रता काय आहे याची माहिती खालीलप्रमाणे...

इंडियन बँक

पोस्ट – सुरक्षा रक्षक

एकूण जागा – 202

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास, माजी सैनिक, स्थानिक भाषेचं ज्ञान

वयोमर्यादा – 26 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट -  indianbank.in

 

मुंबई उपनगर जिल्हा

पोस्ट- विशेष सहाय्यक सरकारी वकील

एकूण जागा –  20

शैक्षणिक पात्रता – कायद्याची पदवी, 5 वर्षांचा अनुभव

नोकरीचं ठिकाण – मुंबई उपनगर

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  16 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट - mumbaisuburban.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर notices मध्ये recruitment वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे 

एकूण 20 जागांसाठी भरती होत आहे.

पहिली पोस्ट – प्रोजेक्ट इंजिनिअर I (इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल)

एकूण जागा – 10

शैक्षणिक पात्रता - BE/B.Tech/(इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल), 2 वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा – 32 वर्षांपर्यंत

 

दुसरी पोस्ट - प्रोजेक्ट इंजिनिअर-I (सिव्हिल/इलेक्ट्रिकल)

एकूण जागा – 2

शैक्षणिक पात्रता - BE/B.Tech/(सिव्हिल/इलेक्ट्रिकल), २ वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा – 32वर्षांपर्यंत

 

तिसरी पोस्ट - ट्रेनी इंजिनिअर-I

एकूण जागा – 8

शैक्षणिक पात्रता - BE/B.Tech/(इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल) 

वयोमर्यादा – 28 वर्षांपर्यंत

नोकरीचं ठिकाण – पुणे, नागपूर

अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - contengr-1@bel.co.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता - Sr. Dy. General Manager (HR&A), Bharat Electronics Limited, N.D.A.Road, Pashan, Pune- 411021

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट - bel-india.in  (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये recruitment advertisement वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. Detailed advertisement वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल. )

संबंधित बातम्या :