Journalist Rana Ayyub Money Laundering Case : सक्तवसुली संचालनालयाने पत्रकार राणा अय्युब (Rana Ayyub) यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (Enforcement Directorate) चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. त्यांच्या विरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. एजन्सीनं जारी केलेल्या लुकआउट परिपत्रकाच्या आधारे, अयुब आज लंडनला जात असताना तिला मुंबई विमानतळावर थांबवण्यात आलं आहे. 


यापूर्वी, ईडीनं 1.7 कोटी रुपयांची मालमत्ता (बँक शिल्लक) जप्त केली होती. राणा अय्युब यांनी एनजीओच्या निधीचा गैरवापर मदत कार्यासाठी केल्याचा आरोप ईडीने केला आहे. अंमलबजावणी संचालनालयानं अय्युबला 1 एप्रिल रोजी या प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं आहे.


या प्रकरणाबाबत महिला पत्रकारानं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "पत्रकारांना धमकावण्याच्या मुद्द्यावर माझं भाषण देण्यासाठी मी लंडनला जाणार्‍या विमानात बसणार होतं, तेव्हा मला थांबवण्यात आलं. जर्नालिझम फेस्टिव्हलमध्ये भारतीय लोकशाही या विषयावर मुख्य भाषण दिल्यानंतर मी लवकरच इटलीला रवाना होणार होते."


1.77 कोटी रुपये जप्त 


दरम्यान, फेब्रुवारीमध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं पत्रकार राणा अय्युब यांचे 1.77 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. पत्रकार राणा अय्युब (Rana Ayyub) यांची 1 कोटी 77 लाख रुपयांची संपत्ती ईडीनं जप्त केली होती. ईडीचा फेरा सध्या राजकीय वर्तुळात तर चर्चेत असतोच. पण आता पत्रकारही त्या लिस्टवर दिसत आहेत. पत्रकार राणा अय्युब यांची 1.77 कोटी रुपयांची संपत्ती ईडीनं जप्त केली होती. क्राऊड फंडिग साईटवरुन मिळवलेला मदतनिधी गैरपद्धतीनं वापरल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. त्यामुळे मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. 


ईडी कारवाईनंतर काय म्हणाल्या होत्या राणा अय्युब?


राणा अय्युब यांनी देणगी म्हणून मिळालेल्या निधीच्या गैरवापराच्या सर्व आरोपांचे खंडन केले होतं.  त्यांनी क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म Ketto वर पैसे कसे उभे केले आणि त्यानंतर कसे खर्च केले याचे तपशील जारी केले आहेत. राणा अय्युब यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं होतं की, माझ्यावरील आरोप निराधार, भ्रामक आणि काल्पनिक आहेत. त्यांनी सांगितलं होतं की, Ketto वर हाती घेतलेल्या माझ्या तीन मोहिमांमध्ये मी एकूण ₹2,69,44,679 (सुमारे 26.9 दशलक्ष) जमा केले होते. माझ्याद्वारे हाती घेतलेल्या मदत कार्यासंबंधातील सर्व बिलं आणि पावत्या पुरवल्याच त्यांनी सांगितलं होतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Rana Ayyub Money Laundering Case : ईडीचा फेरा आता पत्रकारांवरही! राणा अयुब यांची 1 कोटी 77 लाख रुपयांची संपत्ती जप्त