एक्स्प्लोर

ITBP Recruitment 2024 :आयटीबीपीमध्ये 819  जागांवर भरती, 69 हजारांपर्यत पगार, अर्ज कुठे करायचा? 

ITBP Recruitment 2024 : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये 819 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : भारत सरकारच्या गृह विभागाच्या अतंर्गत असलेल्या इंडो तिबेटीयन पोलीस फोर्समध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आयटीबीपीमध्ये 819 पदांची भरती करण्यात येणार आहे. कॉन्स्टेबल किचन सर्विसेस या पदासाठी अर्ज दाखल पात्र उमेदवारांना अर्ज दाखल करण्यात येणार आहे. पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करु शकतात, असं सांगण्यात आलेलं आहे. पात्र उमेदवारांनी आयटीबीपीच्या वेबसाईटला भेट देऊन अर्ज दाखल करावेत. या पदावर निवड झाल्यास उमेदवारांना 21 ते 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळेल.

आयटीबीपीमध्ये किती जागांसाठी भरती?

आयटीबीपीमध्ये एकूण 819 जागांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 458, एससी प्रवर्गासाठी 48, एसटी प्रवर्गासाठी 70, ओबीसी 162 आणि ईडब्ल्यूएस 81 जागा राखीव आहेत. 

शैक्षणिक पात्रता? 

आयटीबीपीमध्ये कॉन्स्टेबल किचन सर्विसेस या पदासाठी अर्ज करण्यासाठी संबंधित उमेदवारानं दहावी उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. अन्न पदार्थ निर्मितीमध्ये एनएसक्यूएफ लेवल 1 चा राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळानं मान्यता दिलेल्या संस्थेतून शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक असणार आहे.   

अर्जाची फी किती?

आयटीबीपीमध्ये अर्ज दाखल करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागेल. तर, महिला, माजी सैनिक,एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना फी भरावी लागणार नाही. एकूण जागांपैकी 10 टक्के जागा माजी सैनिकांसाठी राखीव असतील. 

 आयटीपीबीमध्ये कॉन्स्टेबल किचन सर्विसेस पदासाठी ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना 21700 ते 69100 रुपयांपर्यंत पगार मिळेल. या पदांसाठी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारले जातील. ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी जाहिरात वाचून नंतरच अर्ज दाखल करावा. ईमेल आणि मोबाईल नंबर नोंदवून आयटीबीपीच्या वेबसाईटवर अर्ज दाखल करता येईल. 

पीईटी, पीएसटी आणि लेखी परीक्षेनंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. यानंतर पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केली जाईल.  

अर्ज दाखल कधी करायचा? 

जे पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज दाखल करणार आहेत त्यांनी 2 सप्टेंबरनंतर आयटीबीपीच्या वेबसाईटला भेट द्या. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 1 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. 

भारताच्या निमलष्करी दलांपैकी एक असलेल्या आयटीबीपीमध्ये नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज दाखल करु शकतात. 

इतर बातम्या :

UPSC Exam : मोठी बातमी, UPSC ला आता आधारची मदत, परीक्षेतील फसवेगिरीला चाप लावणार, नियम बदलणार , जाणून घ्या कारण

महत्त्वाच्या बातम्या

नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget