IOB Recruitment 2024: इंडियन ओवरसीज बँकेत 500 हून अधिक पदांची भरती,महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी किती राखीव जागा?
Indian Overseas Bank Recruitment 2024: इंडियन ओवरसीज बँकेत 550 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2024 नवी दिल्ली: इंडियन ओवरसीज बँकेनं एक नोटिफिकेशन जारी केलं आहे. या नोटिफिकेशननुसार बँकेत 550 जागांवर अप्रेंटिस करण्याची संधी मिळणार आहे. पदवीधर उमेदवार या यासाठी अर्ज दाखल करु शकतात. सध्या या पदांसाठी अर्ज नोंदणी सुरु आहे. ज्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करु शकतात.
इंडियन ओवरसीज बँकेत भरती प्रक्रियेद्वारे एकूण 550 जागांवर अप्रेंटिसशिपची संधी देण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचं पदवी शिक्षण पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. पदवी शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे.
इंडियन ओवरसीज बँकेत अप्रेंटिससाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचं वय 20 वर्ष ते 28 वर्षांदरम्यान असणं आवश्यक आहे. इंडियन ओवरसीज बँकेच्या निवड प्रक्रियेनंतर ज्यांची अप्रेंटिससाठी निवड होईल त्यांना 10 हजार ते 15 हजार रुपये विद्यावेतन दिलं जाईलं.
निवड प्रक्रिया कशी पार पडणार?
अप्रेंटिसची संधी देण्यासाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची इंडियन ओवरसीज बँक ऑनलाईन परीक्षा घेईल. त्यानंतर स्थानिक भाषा परीक्षा आणि मुलाखतीनंतर निवड केली जाईल.
अर्जाचं शुल्क किती असणार?
इंडियन ओवरसीज बँकेत अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा आणि अर्जाचं शुल्क द्यावं लागेल. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 944 रुपये, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी 708 रुपये आणि दिव्यांग उमेदवारांना 472 रुपये शुल्क द्यावं लागेल.
दरम्यान, इंडियन ओवरसीज बँक ऑनलाईन परीक्षा 22 सप्टेंबर रोजी घेण्याची शक्यता आहे. तर, महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी 29 जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
अर्ज कसा करायचा?
स्टेप 1: इंडियन ओवरसीज बँकेची अधिकृत वेबसाइट iob.in ला भेट द्या.
स्टेप 2: होमपेजवरील भरती प्रक्रिया या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया करावी.
स्टेप 4: लॉगिन डिटेल्स मिळाल्यानंतर साईन इन करा.
स्टेप 5: अर्जात नमूद असलेल्या सर्व बाबींची माहिती भरा.
स्टेप 6: आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.
स्टेप 7: अर्जाचं शुल्क भरा.
स्टेप 8: अर्जाचं शुल्क भरल्यानंतर अर्जाची प्रत डाऊनलोड करा.
स्टेप 9: अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
इतर बातम्या :
शिक्षण फक्त 12 वी, महिना 69000 रुपये पगार, सरकारी नोकरीची मोठी संधी, अर्ज भरण्यास सुरुवात
पुण्यात महिंद्रा कंपनीत ट्रेनी म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी,कोण अर्ज करु शकणार, नेमक्या अटी काय?