​​​​NPC Recruitment 2022 : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बारावी आणि पदवी उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी राष्ट्रीय उत्पादकता परिषदेनं (National Productivity Council) सपोर्ट एक्झिक्युटिव्हसह अनेक पदांची भरती जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार 26 एप्रिल 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइट npcindia.gov.in ला भेट देऊन या भरतीच्या पदांसाठी अर्ज करू शकतील. 13 एप्रिल 2022 रोजी या भरतीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 


NPC Vacancy 2022 : किती जागांसाठी भरती 


या भरतीअंतर्गत, सपोर्ट एक्झिक्युटिव्हची 3 पदं, टेक्निकल एक्झिक्युटिव्हची 1 पदं, लीगल एक्झिक्युटिव्हचं एक पद आणि वरिष्ठ सल्लागाराच्या 2 पदांसह एकूण 39 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.


NPC Vacancy 2022 : पात्रतेचे निकष


अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारानं कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण केलेली असावी आणि वरिष्ठ सल्लागार पदासाठी उमेदवाराकडे पदवीधर असणं आवश्यक आहे. या भरती मोहिमेची वयोमर्यादा वेगळी आहे.


NPC Vacancy 2022 : वेतन


निवड झालेल्या उमेदवाराला 25000-50000 दरम्यान वेतन देण्यात येईल. 


NPC Vacancy 2022 : महत्त्वाची तारखा 


NPC फॉर्म सबमिट करण्याची शेवटची तारीख : 26 एप्रिल 2022


NPC Vacancy 2022 : निवड कशी होणार?


अधिसूचनेनुसार, या भरती अंतर्गत या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. स्वारस्य असलेले उमेदवार भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या :