पिंपरी चिंचवड Pune Pimpari chinchwad Crime : घरफोडी आणि चोऱ्या करणाऱ्या अटकेतील चोरट्याने चक्क लॉकअप मधून पळ ठोकला. तो लॉकअप मधून कसा बाहेर आला, याचं प्रात्यक्षिक दाखवणारा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चाकण पोलीस (chakan police Station)  स्टेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.


अर्थात आरोपी फरार झाल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी त्याला पुन्हा बेड्या ठोकल्या आहेत. कुणाल बाळू वीर असं आरोपीचं नाव आहे. सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास सगळे पोलीस त्यांच्या कामात दंग होते. तर पोलीस ठाण्यातील अंमलदार हे लघुशंकेला बाहेर आले होते.


त्याचवेळी शरीराने सडपातळ असलेला कुणाल लॉकअपच्या दोन्ही गजांमधून बाहेर पडला अन काही कळायच्या आत त्याने धूम ठोकली. कुणाल हा पसार झाल्याचं समजताच पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. तिथूनच काही अंतरावर असणाऱ्या घरात तो होता. आता इथून पळ काढायचा या तयारीत तो होता. पण बाहेर चाकण पोलिसांनी सापळा रचून ठेवला असेल याची त्याला कल्पनाच नव्हती, तो पावणे दहाच्या सुमारास घरातून बाहेर पडला अन् पुन्हा अटकेत आला. पण या घटनेमुळं पोलीस स्टेशनमधील लॉकअपबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha






हे देखील वाचा-