UPPCL Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची माहिती समोर आलीय. उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (UPPCL) नं कनिष्ठ अभियंता पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदासाठी 25 मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर, 18 मार्च अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट uppcl.org वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.


पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या या भरतीद्वारे एकूण 25 पदांची भरती केली जाणार आहे. ज्यामध्ये 10 पदे अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी, इडब्लूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी 2 पदे , ओबीसी उमेदवारांसाठी 7 पदे, 6 पदे अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण केलेली असावी. यासाठी उमेदवाराचे वय 19 ते 40 वर्षे दरम्यान असावे. आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत मिळेल. या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड सीबीटी मधील कामगिरीच्या आधारावर केली जाणार आहे. या पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना दरमहा 44 हजार 900 रुपये पगार दिला जाईल. 


अर्ज करण्याची प्रक्रिया
- या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं यूपीपीलीएलच्या अधिकृत वेबसाइट https://www.upenergy.in/ ला भेट द्यावी.
- त्यानंतर उमेदवारांना UPPCL JE Recruitment 2022' या लिंकवर क्लिक करा.
- तिथे क्लिक केल्यानंतर उमेदवारांना आपला अर्ज सबमिट करावा.
- त्यानतंर अर्ज डाऊनलोड करून घ्यावा. तसेच या अर्जाची प्रिंट काढून भविष्यासाठी स्वत:जवळ ठेवावी.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha