DRDO Recruitment 2022 : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) च्या डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरी (DFRL) नं पदवीधर शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. आवश्यक पात्रता असलेले उमेदवार 03 मार्च 2022 पूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे, पदवीधर शिकाऊ उमेदवारांची 8 पदं आणि डिप्लोमा अप्रेंटिसची 9 पदं भरली जाणार आहेत. ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयातील बी.टेक (B. Tech) आणि डिप्लोमा अप्रेंटिसच्या पदासाठी उमेदवारांकडून संबंधित विषयातील डिप्लोमा केलेला असणं आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2022 सांगण्यात आली आहे. 


DRDO शिकाऊ भरती 2022 रिक्त जागा तपशील


पदवीधर शिकाऊ : 8 पदं
डिप्लोमा अप्रेंटिस : 9 पदं


DRDO शिकाऊ भरती 2022 पात्रता निकष 


पदवीधर शिकाऊ : संबंधित विषयात बी.टेक (B. Tech)
डिप्लोमा अप्रेंटिस : संबंधित विषयातील डिप्लोमा


DRDO शिकाऊ भर्ती 2022 स्टायपेंड


पदवीधर शिकाऊ : 9000/- रुपये
डिप्लोमा अप्रेंटिस : 8000/- रुपये 


DRDO भरती 2022 साठी निवड निकष


पदवी/डिप्लोमामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केलं जाईल आणि त्यांची निवड केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना रेझ्युमेमध्ये दिलेल्या ऑफर लेटर/मेल आयडीद्वारे सूचित केलं जाईल. निवडलेल्या उमेदवारांना सामील होताना 'मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट' सादर करावं लागेल. निवड झाल्यास नोकरीवर रुजू होण्यासाठी अर्जदारांना कोणताही TA/DA देय असणार नाही.


DRDO शिकाऊ भरती 2022 साठी अर्ज कसा करावा


इच्छुक उमेदवारांनी RAC वेबसाइटवर म्हणजेच, rac.gov.in वर ऑनलाइन नोंदणी करणं आवश्यक आहे. यशस्वी नोंदणीवर, उमेदवार ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी जाहिरातीच्या 3 मार्च 2022 पूर्वी लॉग इन करू शकतात. उमेदवारांना आवश्यक प्रमाणपत्रं अपलोड करण्याचा आणि सबमिशन करण्यापूर्वी अर्ज लॉक करण्याचा सल्ला दिला जातो. उमेदवारांनी अर्ज लॉक केल्यानंतर भरलेल्या अर्जाची प्रत त्यांच्याकडे ठेवण्याचा सल्ला दिला जातो.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha