National Highways Authority of India Recruitment 2022 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (National Highways Authority of India) मुख्य महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक आणि व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागवले होते. ज्यांच्यासाठी अर्ज करण्यास फारसा वेळ शिल्लक नाही. या भरती मोहिमेअंतर्गत 34 रिक्त पदं भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च आणि ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) 24 फेब्रुवारी आहे.
शैक्षणिक पात्रता
- मुख्य महाव्यवस्थापक (वित्त) : उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून वाणिज्य/ लेखा / वित्त / ICAI / ICWAI मध्ये पदवी पूर्ण केलेली असावी
- उपमहाव्यवस्थापक (कायदेशीर) : उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कायद्याची पदवी पूर्ण केलेली असावी
- डेप्युटी जनरल मॅनेजर (मीडिया रिलेशन): उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून पदवी पदवी पूर्ण केलेली असावी
- व्यवस्थापक (तांत्रिक): उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केलेली असावी
वयोमर्यादा
अधिसूचनेनुसार (Notification), या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांची कमाल वयोमर्यादा 56 वर्ष आहे
वेतन
या पदांसाठी 15600 रुपये ते 208700 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया
अधिसूचनेनुसार (Notification), या पदांसाठी निवड प्रक्रिया चाचणी आणि मुलाखतीवर आधारित असेल.
असा करा अर्ज
अर्जदार फक्त ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अर्जदार NHAI वेबसाइट www.nhai.gov.in ला भेट देऊ शकतात. अधिकृत साइटला भेट देणारे उमेदवार, संबंधित भरती जाहिरातीवर क्लिक करा आणि नंतर 'ऑनलाइन अर्ज करा' वर क्लिक करा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Central Railway Recruitment 2022 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! असा करा अर्ज
- एक लाख पगाराची नोकरी मिळवण्याची शेवटची संधी, आत्ताच अर्ज करा
- RBI Assistant Recruitment 2022: रिझर्व्ह बँकेत नोकरी करण्याची संधी, जाणून घ्या बंपर भरतीची संपूर्ण माहिती
- EIL: मॅनेजरपदासह इतर पदांवर थेट भरती; अर्ज करण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha