RBI Assistant Recruitment 2022: रिझर्व्ह बँकेत मोठ्या प्रमाणावर असिस्टंटपदांसाठी भरती करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेतील 950 पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेची माहिती देणारी सूचना रिझर्व्ह बँकेने जाहीर केली आहे. 


इच्छुक उमेदवारांना rbi.org.in या संकेतस्थळावर थेट अर्ज करता येणार आहे. 


वयोमर्यादा :


असिस्टंटपदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 फेब्रुवारी 2022 रोजी 20 ते 28 वर्ष असायला हवे. शासकीय नियमांनुसार, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना यातून सवलत देण्यात आली आहे. अन्य मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्ष आणि अनुसूचिच जात-जमातीच्या उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची सवलत देण्यात आली आहे. 


शैक्षणिक पात्रता: 


उमेदवाराजवळ कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी हवी. ही पदवी परीक्षा त्याने 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 



>> महत्त्वाच्या तारखा:


> ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 17 फेब्रुवारी 2022
> ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 मार्च 2022
> परीक्षेची तारीख : 26 आणि 27 मार्च 2022 


निवड प्रक्रिया: 


RBI Recruitment 2022 साठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनेनुसार,  उमेदवारांची निवड ही पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि एलपीटी परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील परीक्षा 26-27 मार्च 2022 दरम्यान ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. 


परीक्षा शुल्क: 


खुल्या प्रवर्गातील आणि अन्य मागास प्रवर्गातील उमेदवारांना 450 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. तर,  मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना 50 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. परीक्षा शुल्क डेबिट कार्ड/क्रेडीट कार्ड/ नेट बँकिंगच्या माध्यमातून करता येईल. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha