CSIR NAL Recruitment 2022 : तुमच्याकडे 'ही' पदवी असेल, तर झटपट करा सरकारी नोकरीसाठी अर्ज
CSIR NAL Recruitment 2022 : या पदांसाठी अर्ज करणाऱ्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून BE, BTech, M, MSc पदवी असलेले उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

CSIR NAL Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी. भारत सरकारनं अनेक पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज (NAL) अंतर्गत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, CSIR, भारत सरकार यांनी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर रिक्त पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या प्रोजेक्ट एसोसिएट, प्रोजेक्ट असिस्टेंटसह 75 पदांसाठी रिक्त जागा काढण्यात आल्या आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 12 ते 20 ऑक्टोबर 2022 या कालावधीत नियोजित ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून BE, BTech, M, MSc पदवीधर असावे. असे उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 75 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना जाहिरात क्रमांक : 07/2022 वाचण्याचा सल्ला नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजकडून देण्यात आला आहे. भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
मुलाखत कधी आहे ते जाणून घ्या
वॉक-इन-मुलाखतीची तारीख : 12 ऑक्टोबर 2022 ते 20 ऑक्टोबर 2022
भरतीसंदर्भातील माहिती
एकूण पदांची संख्या : 75
प्रोजेक्ट एसोसिएट- I : 04
परियोजना सहायक : 04
प्रोजेक्ट एसोसिएट- I : 06
प्रोजेक्ट एसोसिएट- II : 08
प्रोजेक्ट एसोसिएट- I : 20
प्रोजेक्ट एसोसिएट- II : 16
सीनियर प्रोजेक्ट असिस्टंट : 01
प्रोजेक्ट असिस्टंट : 16
अर्ज कसा कराल?
इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी नियोजित करण्यात आलेली तारीख, 12 ते 20 ऑक्टोबर 2022 या कालावधीत मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. मुलाखतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर वेळेवर पोहोचणं आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता, वय इत्यादींबद्दल अधिक तपशीलांसाठी, अधिकृत वेबसाइट तपासू शकता. उमेदवारांना प्रथम अधिकृत वेबसाइटवर जाण्याची आणि सूचना काळजीपूर्वक वाचा आणि नंतर अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
























