एक्स्प्लोर

BMC Recruitment : मुंबई महापालिकेच्या कार्यकारी सहायक पदासाठी नव्यानं जाहिरात येणार, अर्ज भरलेल्या उमेदवारांनी बीएमसीची महत्त्वाची सूचना

BMC Recruitment 2024 : मुंबई महापालिकेनं 1846 पदांच्या कार्यकारी सहायक पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली होती. त्यातील अटीमध्ये बदल करण्यात आला आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेनं कार्यकारी सहायक म्हणजेच लिपीक (BMC Recruitment 2024) पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली होती. मुंबई महापालिकेनं 1846 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. या भरती प्रक्रियेतील पहिल्या प्रयत्नात दहावी आणि पदवी उत्तीर्ण होण्यासंदर्भातील अट शिथिल करावी, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात आली होती. राजकीय नेत्यांनी देखील या मागणीला पाठिंबा दिला होता. अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना मुंबई महापालिकेनं भरती प्रक्रिया स्थगित करत शैक्षणिक पात्रतेतील बदलाबाबतची अट बदलण्याचा निर्णय मान्य केल्याचं जाहीर केलं. आता मुंबई महापालिका नव्यानं जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. त्यामुळं शैक्षणिक पात्रतेच्या अटीमुळं ज्यांना अर्ज भरता आले नव्हते त्यांना अ्ज सादर करण्यासाठी नव्यानं जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. याशिवाय आतापर्यंत म्हणजेच 20 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत ज्यांनी अर्ज सादर केले होते, त्यांनी काय करायचं याबाबतची माहिती देखील मुंबई महापालिका प्रशासनानं दिली आहे. 

मुंबई महापालिका शैक्षणिक अट दुरुस्त करणार 

मुंबई महापालिकेनं कार्यकारी सहायक भरतीसाठी जारी केलेल्या जाहिरातीत पहिल्या प्रयत्नात दहावी उत्तीर्ण असणं बंधनकार केलं होतं. याशिवाय कला, वाणिज्य आणि विज्ञान यासह इतर शाखांमध्ये पदवी उत्तीर्ण असलेल्या उमेदवाराला 45 टक्के गुण मिळवणं बंधनकारक करण्यात आलं होतं.  विद्यार्थ्यांनी या अटीला विरोध करत ही अट शिथिल करण्याची मागणी केली होती. अखेर स्पर्धा परीक्षा आणि नोकरभरतीची तयारी करणारे विद्यार्थी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्या मागणी सूचनांचा विचार करुन मुंबई महापालिकेनं अट शिथिल करण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्यामुळं जे विद्यार्थी दहावी पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेले नाहीत किंवा पदवीला ज्यांना 45 टक्के गुण मिळाले नाहीत ते  या पदांसाठी अर्ज सादर करु शकतात. 

यापर्वी अर्ज केलेल्यांनी काय करायचं? 

मुंबई महापालिकेनं 1846 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती.  या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत ही 20 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. अखेर काल मुंबई महापालिकेनं विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत अटी बदलणार असल्याची घोषणा केली. या भरतीची नव्यानं जाहिरात प्रसिद्ध करणार असल्याचं देखील मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलं.  याशिवाय ज्या उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज सादर केले आहेत, त्यांनी पुन्हा अर्ज दाखल करण्याची आवश्यकता देखील नाही, असंही मुंबई महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

इतर बातम्या : 

मोठी बातमी! अखेर लिपिक पदासाठीची 'ती' अट रद्द; BMC मधील 1846 जागांसाठी नव्याने जाहिरात

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
Ind vs Zim 1st T20 Live Streaming : स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Embed widget