Bank Recruitment 2022 : सिटीझन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडनं विविध पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यासाठी नवीन अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट citizencreditbank.com ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 19 जुलै 2022 पासून ऑनलाइन सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑगस्ट 2022 आहे.


वयोमर्यादा 


प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी उमेदवारांचे वय 20 ते 30 वर्षे आणि प्रोबेशनरी असोसिएट पदांसाठी 20 ते 26 वर्ष असावं. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार, उच्च वयोमर्यादेत सवलत मिळेल.


शैक्षणिक पात्रता 


या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावी. तपशीलवार माहितीसाठी तुम्ही अधिकृत अधिसूचना तपासू शकता. 


निवड प्रक्रिया


अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे प्रोबेशनरी ऑफिसर आणि प्रोबेशनरी असोसिएटच्या पदांवर भरती केली जाईल. या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. या परीक्षेत तर्कक्षमता आणि संगणक अभियोग्यता, इंग्रजी, बँकिंग आणि सामान्य जागरूकता, परिमाणात्मक आणि संख्यात्मक क्षमता या विषयावर एकूण 200 गुणांचे 160 प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 120 मिनिटं दिली जातील. 


वेतन 


प्रोबेशनरी ऑफिसरच्या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणादरम्यान सुरुवातीच्या 6 महिन्यांसाठी 30,000 रुपये आणि प्रोबेशनरी असोसिएटसाठी 20,000 रुपये प्रति महिना वेतन दिलं जाईल. अधिक तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन संपूर्ण तपशील तपासू शकतात. 


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :