NABARD Assistant Manager Recruitment 2022 : National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) ने सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्यासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट nabard.org ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. 18 जुलै 2022 पासून उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 ऑगस्ट 2022 निश्चित करण्यात आली आहे.
रिक्त जागांचा तपशील
नाबार्डमार्फत जारी करण्यात आलेल्या भरती मोहिमेद्वारे 170 पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीअंतर्गत ग्रामीण विकास बँकिंग सेवेतील सहाय्यक व्यवस्थापक श्रेणी A ची 161 पदं, राजभाषा सेवेतील 7 पदं आणि प्रोटोकॉल आणि सुरक्षा सेवेतील 2 पदांचा समावेश करण्यात आला आहे.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित विषयात किमान 60 टक्के गुणांसह पदवीधर असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
अधिसूचनेनुसार, प्रोटोकॉल आणि सुरक्षा सेवेतील ग्रेड A पदांसाठी भरतीसाठी उमेदवाराचे वय 25 ते 40 वर्षे दरम्यान असावं. तसेच, इतर पदांसाठी उमेदवाराचे वय 21 वर्ष आणि कमाल वय 30 वर्ष निश्चित करण्यात आलं आहे.
निवड प्रक्रिया
या भरती अंतर्गत, उमेदवारांची प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे ग्रेड A च्या पदांवर भरतीसाठी निवड केली जाईल. या प्राथमिक परीक्षेत 200 गुणांचे 200 प्रश्न विचारले जातील आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 120 मिनिटं मिळतील.
अर्ज शुल्क
या भरती मोहिमेसाठी, उमेदवारांना 800 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल.
अर्ज कसा कराल?
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार 18 जुलै ते 7 ऑगस्ट 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइट nabard.org वर जाऊन अर्ज करू शकतील.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :