SEBI Grade A Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी. सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवार सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) माहिती तंत्रज्ञान प्रवाह (SEBI Grade A Recruitment 2022) साठी ऑफिसर ग्रेड A (सहाय्यक व्यवस्थापक) च्या पदांसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट sebi.gov.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. 14 जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे.
सेबीनं जाहीर केलेल्या भरती प्रक्रिये अंतर्गत एकूण 24 पदांवर भरती जाहीर केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 देण्यात आली आहे. त्यापूर्वी अर्ज करणं बंधनकारक असणार आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नसल्याची माहिती अधिसूचनेतून देण्यात आली आहे.
भरती प्रक्रियेतील महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 14 जुलै 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2022
भरतीसंदर्भातील महत्त्वाची माहिती
माहिती तंत्रज्ञान (आयटी) : 24
यूआर : 11
ओबीसी : 5
एससी : 4
एसटी : 3
ईडब्ल्यूएस : 1
शैक्षणिक पात्रता
इच्छुक उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून संगणक अनुप्रयोग/माहिती तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पात्रता (किमान 2 वर्षे कालावधी) असलेल्या कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी किंवा कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी असावी.
वयोमर्यादा
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 30 वर्षांहून अधिक नसावं.
अर्ज शुल्क
या पदांसाठी अर्ज करणार्या सामान्य OBC आणि EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1000 रुपये आहे आणि SC, ST, PWBD उमेदवारांसाठी 100 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल.
वेतन
अ श्रेणीतील अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी 44500-2500(4)-54500-2850(7)-74450-EB-2850(4)-85850- 3300(1)-89150 (17 वर्ष) आहे.
निवड प्रक्रिया
- पहिला टप्पा : ऑनलाइन स्क्रीनिंग परीक्षा ज्यामध्ये प्रत्येकी 100 गुणांचे दोन पेपर असतात.
- दुसरा टप्पा : 100-100 गुणांच्या दोन पेपरची ऑनलाइन परीक्षा होईल.
- तिसरा टप्पा : मुलाखत घेतली जाईल.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :