Virat Kohli Exercise: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची (Virat Kohli) इंग्लंड दौऱ्यातील कामगिरी निराशाजनक ठरलीय. त्यानंतर वेस्ट इंडीजविरुद्ध दौऱ्यात विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. आगामी आशिया चषकात विराट कोहली भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. नुकताच विराट कोहलीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केलाय. ज्यात तो भांगडा स्टाईलमध्ये एक्सरसाइज करत आहे. या व्हिडिओला मोठी पसंती मिळत आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंटही करत आहेत. 


विराट कोहलीची बॅट गेल्या काही दिवसांपासून शांत आहे. परंतु, फिटनेसची किती काळजी घेतो, हे सर्वांनाच माहिती आहे. दरम्यान, विराट कोहलीनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो भांगडा स्टाईल एक्सरसाईज करत आहे. या दरम्यान बॅकग्राऊंडमध्ये पंजाबी म्यूजिक वाजत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये विराट कोहलीनं लिहिलंय की, "हे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होतं, परंतु, मला वाटतंय की, यासाठी जास्त उशीर झाला नाही." विराटच्या या व्हिडिओला एका तासाच्या आत 15 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.


व्हिडिओ-







 
विराट कोहलीची गेल्या अडीच वर्षापासून बॅट शांत
विराट कोहलीला गेल्या अडीच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकही शतक झळकावता आलं नाही. रन मशीन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली सध्या मैदानात संघ करताना दिसत आहे. त्यानं नोव्हेंबर 2019 मध्ये अखेरचं शतक झळकावलं होतं. त्यानं कोलकाताच्या ईडन गार्डनवर 136 धावांची खेळी केली होती. मात्र, तेव्हापासून विराट कोहलीची बॅट शांत आहे. त्यानंतर विराट कोहलीनं आतापर्यंत एकूण 68 सामन्यातील 79 डावात 2 हजार 554 धावा केल्या आहेत. ज्यात 24 अर्धशतकाचा समावेश आहे. 


इंग्लंड दौऱ्यात विराटची निराशाजक कामगिरी
विराट कोहलीनं इंग्लंड दौऱ्यात 6 डावात फक्त 76 धावा केल्या. सुरुवातीला एजबॅस्टन कसोटी सामन्यात त्यानं 31 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर दोन टी-20 सामन्यात त्यानं एकून 12 धवा केल्या. इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत विराट कोहली चांगलं प्रदर्शन करून दाखवेल, अशी अपेक्षा होती. परंतु, एकदिवसीय मालिकेतही त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यानं 16 आणि तिसऱ्या सामन्यात 17 धावा करून माघारी परतलाय. 



हे देखील वाचा-