Bank of Baroda Vacancy 2022 : तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. बँक ऑफ बडोदानं अलीकडेच 42 रिक्त पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली होती. त्यात त्यांनी 42 पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्याचं ठरवलं होतं. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)च्या या भरतीद्वारे, फसवणूक जोखीम आणि जोखीम व्यवस्थापन (Fraud Risk and Risk Management Department) विभागात पदांची भरती केली जाईल. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी या पदांसाठी अर्ज करावेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. 


बँक ऑफ बडोदा भरती महत्वाच्या तारखा


अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 23 फेब्रुवारी 2022
अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2022


बँक ऑफ बडोदा भरती रिक्त जागा तपशील


या भरती मोहिमेअंतर्गत 42 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.


बँक ऑफ बडोदा भरती अर्ज फी


सामान्य / EWS / OBC श्रेणीतील उमेदवारांना 600 रुपये अर्ज शुल्क भरावा लागेल. तर SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवार आणि महिला उमेदवारांना 100 रुपये भरावे लागतील.


बँक ऑफ बडोदा भर्ती 2022 अशा प्रकारे अर्ज करा



  • अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in ला भेट द्या.

  • आता उमेदवार करिअर टॅब अंतर्गत 'सध्याच्या संधी' वर क्लिक करा.

  • फसवणूक जोखीम आणि जोखीम व्यवस्थापन विभागासाठी नियमित/कंत्राटी आधारावर विविध पदांसाठी भरती. "आता अर्ज करा" वर क्लिक करा.

  • अर्ज भरा, पोस्ट निवडा, कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा.

  • अर्ज सबमिट करा.

  • उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची प्रिंट आउट भविष्यातील संदर्भासाठी त्यांच्याकडे ठेवावी.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha