मुंबई : भारतीय स्टेट बँकेने स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. या नोटिफिकेशननुसार, एकूण चार पदासांठी भरती केली जाईल. अर्जाची प्रकिया 4 मार्चपासून सुरु झाली आहे. इच्छुक तसंच पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट sbi.co.in/web/career वर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात.

ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची तारीख - 4 मार्च 2022

ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख - 31 मार्च 2022

सा अर्ज दाखल करा!- या जागेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर जा- वेबसाईटच्या होमपेजवर current openings वर क्लिक करा- आता RECRUITMENT OF SPECIALIST CADRE OFFICERS ON Contratual BASIS लिंकवर जा- इथे संबंधित माहिती भरुन नोंदणी करा- रजिस्ट्रेशनंतर अॅप्लिकेशन फॉर्म भरा- अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रिंट अवश्य घ्या.

वयोमर्यादाभारतीय स्टेट बँकेत मुख्य माहिती अधिकारी, चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 55 वर्ष असावी. तर डेप्युटी चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर आणि डिप्युटी चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 45 वर्ष असावं. सरकारी नियमांनुसार, आरक्षित वर्गासाठी सूट देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रताया पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची बॅचलर किंवा मास्टर डिग्री असावी. ज्या उमेदवारांकडे एमबीएची पदवी आहे, त्यांना प्राधान्य दिलं जाईल.

SBI SCO Recruitment 2022 पदांचं विवरणमुख्य माहिती अधिकारी - 1 पदमुख्य तंत्रज्ञान अधिकारी - 1 पदउपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (ई-चॅनल) - 1 पदउपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (कोर बँकिंग) - 1 पद

अर्जाचं शुल्कआरक्षित श्रेणीतील पुरुष उमेदवारांना अर्जाचं शुल्क द्यावं लागणार नाही. तर खुल्या, इतर मागास वर्ग आणि ईडब्लूएस उमेदवारांना 750 रुपये शुल्क द्यावे लागेल. तर परीक्षेचं शुल्क केवळ डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगच्या माध्यमातूनच करता येईल.