IPL 2024
क्रिकेट
निवडणूक
अयोध्या राम मंदिर
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्रीडा
फोटो
राशीभविष्य
वेब स्टोरी
वर वधू
इतर
By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 27 Nov 2020 08:58 PM (IST)
प्रातिनिधीक फोटो
नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एसओ. 4252 (ई) अन्वये 26 नोव्हेंबर 2020 रोजी ‘दुचाकी मोटार वाहनस्वारांसाठी हेल्मेट आदेश 2020’ जारी केला आहे. अनिवार्य बीआयएस प्रमाणपत्र आणि गुणवत्ता नियंत्रण आदेशाअंतर्गत दुचाकी स्वारासाठी संरक्षक हेल्मेटचा समावेश करण्यात आला आहे. देशातील हवामानाच्या अनुषंगाने भारतामध्ये वजनाने हलके हेल्मेट वापरण्या संदर्भात विचार करण्यासाठी आणि हेल्मेट घालण्यासंदर्भात नागरिकांमध्ये अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी रस्ता सुरक्षाविषयक सर्वोच्च न्यायालयाच्या समितीच्या निर्देशानुसार एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीमध्ये एम्समधील तज्ञ डॉक्टरांसह आणि बीआयएस तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ यांचा समावेश आहे. मार्च 2018 मध्ये समितीने आपल्या अहवालातील सखोल विश्लेषणानंतर देशामध्ये वजनाने हलके असलेले हेल्मेट वापरण्याची शिफारस केली आणि मंत्रालयाने तो अहवाल स्वीकारला. समितीच्या शिफारशींनुसार, बीआयएसने काही वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा केली असून यामुळे वजनाने हलकी हेल्मेट तयार करणे अपेक्षित आहे. भारतीय बाजारपेठेत असलेली चांगली स्पर्धा आणि असंख्य हेल्मेट उत्पादक कंपन्यांमुळे आता चांगल्या प्रतीची आणि वजनाने हलक्या असणाऱ्या हेल्मेट्सचे उत्पादन करण्यास सहाय्य मिळेल अशी अपेक्षा आहे.
भारतात दरवर्षी एकूण सुमारे 1.7 कोटी दुचाकींचे उत्पादन होते.आता देशात दुचाकी वाहनांसाठी केवळ बीआयएस प्रमाणित दुचाकी हेल्मेट उत्पादित केली जातील आणि विकली जातील. यामुळे देशातील हलक्या प्रतीच्या दुचाकी हेल्मेटच्या विक्रीला आळा घालण्यास मदत होईल. दुचाकी अपघातांमध्ये नागरिकांना होणाऱ्या प्राणघातक जखमा कमी होण्यासही यामुळे मदत होईल.
Horoscope Today 1 January 2026: 2026 वर्षाचा पहिलाच दिवस 4 राशींसाठी भाग्यशाली! दत्तगुरूंच्या कृपेने प्रश्न मार्गी लागणार, आजचे राशीभविष्य वाचा
2026 मध्ये 'हे' पाच दिग्गज खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती
BMC : उमेदवारी मिळाली नाही, मग इच्छुकाने भाजपच्या नावे डुप्लिकेट एबी फॉर्म जोडला; अमीत साटम यांचे निवडणूक आयोगाला पत्र
धक्कादायक! श्रीरामपूरमध्ये भरदिवसा गोळीबार, जामिनावर असलेल्या बंटी जहागिरदारचा मृत्यू, हल्लेखोरांचा शोध सुरु
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज, जुहू चौपाटीवर मोठी गर्दी, सुरक्षेच्या दृष्टीने पाण्यापासून लांब राहण्याच्या पोलिसांच्या सूचना
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी