एक्स्प्लोर

ठसकेबाज लावणी, ढोलकीची थाप, पायात घुंगरू अन् नटरंगी नार; 'झिंग' सिनेमाचा तडका देणारा टिझर OUT

तमाशा म्हणजे नेमकं काय, याचं इतकं सुंदर वर्णन करणारा ‘झिंग’ चित्रपटाचा टिझर समोर आला आहे आणि काही तासांतच तुफान व्हायरल झाला आहे.

Zing Marathi Movie Trailer Out: “तमाशा म्हणजे काय? सांगणारा आणि मैफिलीत रंग भरणाऱ्या ‘झिंग’ चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या पसंतीला आणि चित्रपटाबद्दल ची उत्सुकता शिगेला नेऊन ठेवणारा”  तमाशातील लावणी कशी असावी याचे सुंदर वर्णन करणारा 'झिंग' चित्रपट येत्या 19 सप्टेंबर पासून  आपल्या जवळच्या सिनेमागृहात, नुकताच याचा टिझर समोर आला आहे.

“तमाशा म्हणजे काय?, तर तमाशा हा विविध रंगांनी, ढंगांनी, रसांनी नटलेला असतो. तमाशा म्हणजे चरचरीत लावणी, ढोलकीची थाप आणि पायात घुंगरू घालून सादर करणारी नटरंगी नार…!” हे शब्द कानावर पडले आणि प्रेक्षकांच्या भुवया आपोआप उंचावल्या. तमाशा म्हणजे नेमकं काय, याचं इतकं सुंदर वर्णन करणारा ‘झिंग’ चित्रपटाचा टिझर समोर आला आहे आणि काही तासांतच तुफान व्हायरल झाला आहे.

ढोलकी, मृदूंग, टाळ, तुणतुणं, वग टिझरमधून जिवंत

या चित्रपटाच्या पोस्टरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता खूप वाढली होतीच, पण आता टिझरने त्या उत्सुकतेला नवा उंचीला नेवून ठेवलंय. “तमाशा म्हणजे काय?” या एका प्रश्नातून सुरू होणारा टिझर, प्रेक्षकांना थेट तमाशाच्या फडासमोर नेऊन सोडतो.

ढोलकी, मृदूंग, टाळ, तुणतुणं, वग आणि त्यातली हसवणारी, रडवणारी, थिरकवणारी मजा हे सगळं टिझरमधून जिवंत झालंय. तमाशाच्या या रंगतदार वर्णनातून गावातल्या उनाड, स्वप्नाळू किसनाची कथा पुढे सरकते. वडिलांचं अपूर्ण स्वप्न – तमाशाचा फड उभारण्याचं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो कसा झगडतो, हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात सुरू आहे.

गाण्याच्या काही ओळी टिझरमध्ये डोकावल्यात...

विशेष म्हणजे ‘झिंग’ मध्ये काम करणारे सर्व कलाकार नवोदित असूनही, त्यांच्या अभिनयाची झलक टिझरमध्ये प्रेक्षकांना भावणारी आहे. गाण्याच्या काही ओळी टिझरमध्ये डोकावल्या आहेत, आणि आता प्रेक्षक संपूर्ण गाण्यावर थिरकण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘ड्रीम लालटन प्रोडक्शन्स’ आणि ‘रेडब्रिक्स मोशन पिक्चर’ प्रस्तुत, दिपक पेटकर आणि सौरभ किरणकुमार कुंभार निर्मित ‘झिंग’ हा चित्रपट दिग्दर्शक अमित वाल्मिक कोळी यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाला पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले असून, लावणी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले आशिष पाटील यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे, प्रताप जोशी यांनी या चित्रपटाचं छायाचित्रण केलं आहे." संगीत, नृत्य आणि  भावनांची उधळण करणारी ही रंगतदार मैफल १९ सप्टेंबरपासून आपल्या जवळच्या सिनेमागृहात रंगणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगाव, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?

व्हिडीओ

Mumbai congress Nagarsevak : BMC मध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक, कोणते मुद्दे घेऊन पालिकेत जाणार?
Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगाव, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
Embed widget