Zee Marathi Serial TRP :  नुकतच आलेल्या टीआरपीच्या रिपोर्टनुसार स्टार प्रवाहवरील (Star Pravah) मालिकांनी बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे.  पण या शर्यतीत झी मराठी (Zee Marathi) मात्र मागेच पडलं आहे. सध्या झी मराठी वाहिनीवर नव्या मालिकांचं सत्र सुरु आहे. नुकतीच वाहिनीवर शिवा (Shiva) आणि पारु (Paaru) या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या दोन मालिकांना मात्र टीआरपीच्या शर्यतीत स्थान मिळालं असल्याचं चित्र आहे. 


झी मराठीवरील शिवा आणि पारु तसेच सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिका टीआरपीच्या रिपोर्टमध्ये आहेत.पण या मालिकांना अगदीच खालचा नंबर मिळालाय. सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका तर शेवटच्या स्थानावर आहे. 


झी मराठीवर नव्या मालिकांचं सत्र


झी मराठी वाहिनीवर काही दिवसांत नवरी मिळे हिटलरला आणि पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका सुरु होणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी शिवा आणि पारु या दोन मालिका सुरु झाल्या. सध्या या वाहिनीवरील पारु ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं चित्र आहे. पारु ही मालिका टीआरपीच्या रिपोर्टमध्ये 17 व्या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे शिवा ही मालिका 18 व्या स्थानावर आहे. सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका शेवटच्या म्हणजेच 20 व्या स्थानावर आहे. 


झी मराठीवरील मालिकांचे रेटींग


झी मराठी वाहिनीवरील पारु ही मालिका 17 व्या स्थानावर आहे. या मालिकेला 2.5 इतके रेटींग आहे. शिवा ही मालिका 18 व्या स्थानावर आहे. या मालिकेला 2.7 इतके रेटींग आहे. सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका टीआरपीच्या रिपोर्टमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. या मालिकेला 2.5 इतके रेटींग आहे. 


स्टार प्रवाहच्या मालिकांना प्रेक्षकांची पसंती 


स्टार प्रवाहवरील जवळपास सर्वच मालिका या टीआरपीमध्ये अव्वल असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये ठरलं तर मग या मालिकेने पुन्हा एकदा टीआरपीच्या शर्यातीत बाजी मारली आहे. तसेच या शर्यातील ठरलं तर मगच्या खाली दोन्हीही मालिका या स्टार प्रवाह वाहिनीच्या आहेत. प्रेमाची गोष्ट ही मालिका टीआरपीच्या शर्यातीत दुसऱ्या स्थानावर आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. 






ही बातमी वाचा : 


Marathi Serials TRP : या आठड्यातही 'ठरलं तर मग!' टीआरपीच्या शर्यातीत पुन्हा एकदा स्टार प्रवाहची बाजी, 'प्रेमाच्या गोष्टी'नेही जिंकली प्रेक्षकांची मनं