Marathi Serials TRP : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेने पुन्हा एकदा टीआरपीच्या शर्यातीत बाजी मारली आहे. तसेच या शर्यातील ठरलं तर मगच्या खाली दोन्हीही मालिका या स्टार प्रवाह वाहिनीच्या आहेत. 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) ही मालिका टीआरपीच्या शर्यातीत दुसऱ्या स्थानावर आहे तर 'लक्ष्मीच्या पावलांनी' (Lakshmichya Pavalani) ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. 


छोट्या पडद्यावर विविध चॅनल असून सध्या स्टार प्रवाहवरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. झी मराठी, कलर्स सारख्या मोठ्या बॅनर असणाऱ्या मालिका पाहायला प्रेक्षक नापसंती देत आहेत. अभिनेत्री जुई गडकरीची 'ठरलं तर मग' ही मालिका गेल्या काही आठवड्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळेसध्या जुईचं छोट्या पडद्यावर राज्य आहे, असं म्हणायला हरकत नाही.



टीआरपीच्या शर्यातीतील टॉप 10 मालिका 



1. टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.7 रेटिंग मिळाले आहे.


2. 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून टीआरपीच्या रेसमध्ये ही दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.5 रेटींग मिळाले आहे. 


3. 'लक्ष्मीच्या पावलांनी' (Lakshmichya Pavalani) ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.4 रेटिंग मिळाले आहे.


4. 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका चौथ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.3 रेटिंग मिळाले आहे.


5. टीआरपी लिस्टमध्ये 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका पाचव्या स्थानावर आहे. या मालिकेला 5.9 रेटिंग मिळाले आहे.


6. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सहाव्या क्रमांकावर असून या मालिकेला 5.3 रेटिंग मिळाले आहे.


7. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळतंय.


8. आई कुठे काय करते मालिकेचा महाएपिसोड देखील टीआरपीच्या शर्यातीत आहे. 


9. 'कुन्या राजाची गं तू रानी' (Kunya Rajachi Ga Tu Rani) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत नवव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 4.6 रेटिंग मिळाले आहे.


10. मन धागा धागा जोडते नवा ही मालिका टीआरपीच्या शर्यातील दहाव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला  4.6 रेटिंग मिळाले आहे.


ही बातमी वाचा : 


Purshottam Berde on laxmikant berde : 'लक्ष्याने स्वत:ला संपवलं', भाऊ पुरुषोत्तम बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबाबत केला मोठा खुलासा