एक्स्प्लोर

Utkarsh Shinde On Marathi Langauge Compulsion: 'मराठीच कळत नाही किंवा कळून घ्याचीच नाही, म्हटल्यावर...'; अमराठी रिक्षा चालकांना मराठमोळ्या गायकाचा थेट इशारा

Utkarsh Shinde On Marathi Langauge Compulsion: प्रशासनाच्या या निर्णयामुळे काही रिक्षाचालकांमध्ये नाराजीचं वातावरण असून, त्यांनी संपाचाही इशारा दिलाय. या मुद्द्यावरून सध्या विविध स्तरांवर चर्चा सुरू असून, अनेक मराठी कलाकारही आपली भूमिका मांडताना दिसत आहेत.

Utkarsh Shinde On Marathi Langauge Compulsion: येत्या 'महाराष्ट्र दिना'पासून (Maharashtra Din) राज्यातील परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचं ज्ञान (Marathi Language For Rickshaw And Taxi Drivers) अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेदरम्यान चालकांना मराठी (Marathi Langauge) वाचता आणि लिहिता येतं का, याची प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे. तसेच, ज्या चालकांना मराठीचं (Marathi Drivers) आवश्यक ज्ञान नसेल, त्यांच्या परवान्यांवर कारवाई करून ते रद्द करण्याचा इशाराही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Transport Minister Pratap Sarnaik) यांनी दिला आहे. 

प्रशासनाच्या या निर्णयामुळे काही रिक्षाचालकांमध्ये नाराजीचं वातावरण असून, त्यांनी संपाचाही इशारा दिलाय. या मुद्द्यावरून सध्या विविध स्तरांवर चर्चा सुरू असून, अनेक मराठी कलाकारही आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. अशातच 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) फेम सुप्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आपलं मत व्यक्त केलं आहे. 

गायक उत्कर्ष शिंदे नेमकं काय म्हणाला? (Utkarsh Shinde On Marathi Langauge)

'बिग बॉस मराठी' फेम गायक उत्कर्ष शिंदे यानं त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन एक फोटो शेअर केलाय. दादरच्या शिवसेना भवन इथला हा फोटो आहे. हा फोटो शेअर करत उत्कर्ष शिंदे यानं मराठी भाषेला विरोध करणाऱ्या रिक्षा चालकांना खडे बोल सुनावले आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr Utkarsh Anand Shinde (@utkarshshindeofficial)

मराठी अस्मिता काय कळणार... : गायक उत्कर्ष शिंदे

"मराठी येत नसेल तर शिका आणि शिकायचीच नसेल तर निघा… परप्रांतीय मित्रांनो तुमचा द्वेष नाही, आम्हाला हा आमच्या मराठी भाषेसाठीचा, मानसन्मान, अभिमान आहे... तुम्हाला मराठीच कळत नाही किंवा कळून घ्याचीच नाही, म्हटल्यावर मराठी अस्मिता काय कळणार... ठिक आहे, तुम्हाला कळेल त्या भाषेत समजविण्याचा प्रयत्न मराठी माणूस नक्की करेल...", असं उत्कृष्ट शिंदे यानं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

उत्कर्ष शिंदेनं केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. उत्कर्ष अनेकदा त्याच्या सोशल मीडियावरुन समाजातील घटनांवर भाष्य करत असतो. उत्कर्ष व्यतिरिक्त अनेक मराठी कलाकारांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम सचिन गोस्वामी, अभिनेता अंशुमन विचारे यांनीही या मुद्द्यावर पोस्ट करत भाष्य केलंय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Marathi Actor Parth Samthaan Final Social Media Post: 'नकारात्मकतेत स्वतःला संपवण्यापेक्षा...', ट्रोलिंगला वैतागलेल्या मराठमोळ्या अभिनेत्यानं उचललं खूप मोठं पाऊल, चाहत्यांसोबत शेवटची पोस्ट शेअर

महत्त्वाच्या बातम्या

कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget