Boss Mazi Ladachi : 'बॉस माझी लाडाची' (Boss Mazi Ladachi) ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. आता या मालिकेतील बॉस म्हणजेच राजेश्वरी हर्षे लग्न करण्यासाठी तयार झाली आहे. 


मालिकेत राजेश्वरीला बघायला स्थळं येऊ लागली आहेत. त्या स्थळांमध्ये दोन स्थळं अर्थातच येणारी मुलं प्रेक्षकांचे चांगलेच लाडके आहेत.  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील दत्तू मोरे आणि निखिल बने आगामी भागामध्ये बघायला येणाऱ्या मुलांच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहेत.





दत्तू आणि निखिल आल्यावर राजेश्वरी त्यांना पसंत करणार का? तिच्या सगळ्या अटींमध्ये ही मुलं बसत असतील का? मुळात मालिकेत काय धम्माल घडणार, हे बघणं रोमांचकारी आहे. मालिकेत नक्की काय घडणार, बॉस खुश होणार की या मुलांची फजिती होणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे.  अभिनेत्री भाग्यश्री लिमये (Bhagyashree Limaye) आणि अभिनेता आयुष संजीव (Aayush Sanjeev) या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. 


संबंधित बातम्या


TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Indian Idol Marathi : 'इंडियन आयडॉल मराठी'च्या मंचावर अशोक सराफ लावणार हजेरी, सूरांच्या मंचावर पसरणार उत्साह


Filmfare Awads Marathi : एबीपी स्टुडिओची सह-निर्मिती असलेल्या 'कारखानीसांची वारी'ने पटकावला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha