TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


एबीपी स्टुडिओची सह-निर्मिती असलेल्या 'कारखानीसांची वारी'ने पटकावला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार


मराठी सिनेसृष्टीतील सर्वात महत्त्वाचा पुरस्कार सोहळा अर्थात 'फिल्म फेअर पुरस्कार सोहळा' नुकताच पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ्यात एबीपी स्टूडिओची सह-निर्माती असलेल्या 'कारखानीसांची वारी' या सिनेमाने सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार पटकावला आहे. मंगेश जोशी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते.


शरद पवारांची 'द कश्मीर फाइल्स'वर टीका


'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाबद्दल शरद पवार म्हणाले, 'द काश्मिर फाईल्स  चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती, तसेच या चित्रपटातून खोटा प्रचार केला जातोय. देशातील परिस्थिती सर्वांना दिसत आहे. देशात सांप्रदायिक शक्तीचा जोर वाढताना देखील दिसतोय.पंतप्रधान कुठल्याही पक्षाचे असले तरी त्यांना देश एक ठेवणं महत्वाचं असतं. मात्र पंतप्रधान म्हणतात चित्रपट चांगला आहे.'


कंगनाच्या ‘लॉक अप’मधून करण कुंद्राची एक्झिट?


‘बिग बॉस’नंतर कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ शोमध्ये करण कुंद्रा जेलरच्या भूमिकेत दिसला होता. तो स्पर्धकांना जोरदार बोल लगावताना देताना दिसला, पण नवीन शोचा प्रोमो आल्यानंतर करण ‘लॉक अप’ शोला बाय बाय करणार असल्याचं बोललं जात आहे.


विनोदवीर विशाखा सुभेदारचा हास्यजत्रेला रामराम


विनोदवीर विशाखा सुभेदारने आता  हास्यजत्रेला रामराम केला आहे. सोशल मीडिया पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना ही बातमी दिली आहे. वेगळ्या धाटणीचं काम करण्यासाठी तिने हास्यजत्रा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 


मिथिला पालकरची भावनिक पोस्ट


सोशल मीडिया क्वीन अशी ओळख असणारी अभिनेत्री मिथिला पालकर सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. तिच्या आजोबांचे 26 मार्च रोजी निधन झाले. ते 94 वर्षाचे होते. मिथिलानं नुकतीच एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिनं तिच्या आजोबांचे काही फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


संबंधित बातम्या


Indian Idol Marathi : 'इंडियन आयडॉल मराठी'च्या मंचावर अशोक सराफ लावणार हजेरी, सूरांच्या मंचावर पसरणार उत्साह


Legends of Ramayana : डिस्कव्हरीवर येणार 'लीजंडस ऑफ द रामायणा विथ अमिष'


Dasvi : अभिषेक बच्चनच्या 'दसवीं' सिनेमातील 'ठान लिया' गाणं रिलीज


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha