Indian Idol Marathi : 'इंडियन आयडॉल मराठी' (Indian Idol Marathi) या कार्यक्रमातील प्रत्येक स्पर्धकाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यंदाच्या आठवड्यात स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) येणार आहेत. 


'इंडियन आयडॉल मराठी'चा आगामी भाग खूपच खास असणार आहे. मराठी सिने-सृष्टीतील सुप्रसिद्ध, दिग्गज अभिनेते अशोक सराफ 'इंडियन आयडॉल मराठी'च्या मंचावर येणार आहेत. दरम्यान ते जुन्या आठवणींना उजाळा देणार आहेत.





मराठी मनोरंजनसृष्टी ज्यांना 'अशोक मामा' म्हणून ओळखते त्यांनी फक्त विनोदी भूमिका नाहीत तर गंभीर भूमिका सुद्धा चोखपणे बजावल्या आहेत आणि म्हणूनच काही मोजक्या चतुरस्त्र अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते. एक खटयाळ प्रियकर असो किंवा अगदी वयोवृद्धाची भूमिका असो, आपल्या सगळ्याच भूमिका त्यांनी जबरदस्त अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर कोरून ठेवल्या आहेत. अशोक मामांच्या येण्याने सूरांच्या मंचावर उत्साह पसरणार असून स्पर्धक अशोक सराफ यांच्यावरच चित्रीत झालेली गाणी साजरी करणार आहेत.


संबंधित बातम्या


Filmfare Awads Marathi 2021 : अंकुश चौधरी ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी


Vishakha Subhedar : विनोदवीर विशाखा सुभेदारचा हास्यजत्रेला रामराम, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती


Mrunal Dusanis : मृणाल दुसानिसला कन्यारत्न, पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गोड बातमी


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha