Arvind Kejriwal in Gujarat: सध्या आम आदमी पार्टी देशात आपली राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत आप ने पंजाब राज्यात एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यानंतर आप चा आत्मविश्वास वाढला आहे. आम आदमी पार्टीने आता आपला मोर्चा गुजरातकडे वळवण्याचे संकेत दिले आहेत. पंजाब जिंकल्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे लक्ष आता गुजरात विधानसभा निवडणुकीवर आहे. आजपासून केजरीवाल गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील असणार आहेत. तसेच हे दोन्ही नेत आज अहमदाबादमध्ये रोड शो देखील करणार आहेत.



दुपारी 4 ते 6 या वेळेत रोड शो होणार 


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज सकाळी 10 वाजता गांधी आश्रमाला भेट देणार आहेत. तर सायंकाळी 4 ते 6 वाजता ते रोड शो करणार आहेत. अरविंद केजरीवाल आणि भागवत मान यांचा अहमदाबादमध्ये रोड शो होणार आहे. दोघेही तिरंगा यात्रेत सहभागी होणार आहेत. यानंतर उद्या म्हणजेच 3 एप्रिलला अरविंद केजरीवाल सकाळी साडेदहा वाजता स्वामीनारायण मंदिरात पोहोचतील. त्यानंतर ते गुजरातशी संबंधित पक्षाच्या नेत्यांची भेट घेतील. त्यानंतर संध्याकाळी ते दिल्लीकडे रवाना होणार आहेत.


दरम्यान, अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांचा हा दोन दिवसांचा गुजरात दौरा म्हणजे येणाऱ्या निवडणुकांची तयारी असल्याचे बोलले जात आहे. या वर्षाच्या अखेरीस गुजरात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होमर आहेत. या निवडणुकांच्या दृष्टीने आपची तयारी असल्याचे बोलले जात आहे. आजच्या या रोड शोममुळं कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणार आहे. तसेच गुजरातच्या जनतेमध्ये एक मोठा संदेश जाईल की, यावेळी गुजरातची निवडणूक आम आदमी पार्टी पूर्ण जोमाने लढेल.


केजरीवालांची नजर हिमाचलवरही


दरम्यान, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर आता अन्य राज्यांमध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा करण्याची तयारी केली आहे. या वर्षाच्या अखेरीस हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत. आम आदमी पक्षाने यासाठी तयारी सुरु केली आहे. दिल्ली मॉडेलच्या माध्यमातून पंजाबमध्ये जमीन तयार करण्यात आली आणि आता पंजाबच्या माध्यमातून 'आप'ला देशभर आपली ताकद वाढवायची आहे.


महत्त्वाच्या बातम्या: