नियॉन कलरची बिकनी का घातली? कियारा अडवाणीच्या बिकनी शूटबाबत मोठा खुलासा
Kiara Advani Neon Bikini : नियॉन कलरची बिकनी का घातली? कियारा अडवाणीच्या बिकनी शूटबाबत मोठा खुलासा झालाय.

Kiara Advani Neon Bikini : वॉर 2 या सिनेमाचा टीझर दोन दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. दरम्यान, या टीझरमध्ये अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) बिकनीमध्ये झळकलेली पाहायला मिळालीये. त्यानंतर सर्व सोशल मीडियावर कियारा अडवाणीच्या (Kiara Advani Neon Bikini) या बिकनी शूटबद्दल चर्चा सुरु आहे.
हृतिक रोशन, ज्युनियर एनटीआर यांच्या 'वॉर 2' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये हृतिक आणि ज्युनियर एनटीआर जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहेत पण सर्व लाइमलाइट कियारा अडवाणीने मिळवली आहे. टीझरमध्ये कियाराची झलक दिसते आणि तिची एक झलकच सर्वांना आकर्षित करण्यासाठी पुरेशी होती. कियाराच्या 'वॉर 2'च्या टिझरमधील बिकनी लूकबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.
या फोटोमध्ये कियाराने निऑन रंगाची बिकिनी घातली आहे. कियाराचा हा बोल्ड लूक स्टायलिस्ट अनिता श्रॉफने डिझाइन केला आहे. त्याने पहिल्यांदाच कियाराला स्टाईल केले आहे. अनाइताने कियाराने निऑन रंगाची बिकिनी का घातली याचा खुलासा केला आहे. अनाइताने यामागील खास कारण त्यांनी सांगितले आहे.
अनाइता म्हणाली, कियाराच्या बिकिनीचा रंग हिरवा किंवा पिवळा नाही तर निऑन लाईम ग्रीन शेड आहे. लोकांचे लक्ष त्वरित तिच्याकडे वेधले जावे म्हणून हे केले गेले आहे. पुढे बोलताना म्हणाला , बिकिनी साधी ठेवताना त्यात एक वेगळा ट्विस्ट देण्यात आला आहे. पहिल्यांदाच बिकिनी चार्म्स वापरण्यात आले आहेत जे खूप सुंदर दिसतात. या लूकसाठी कियाराने खूप मेहनत घेतली आहे. ती काहीही विचार न करता इकडे तिकडे फिरत होती. तुम्ही तिचे अद्भुत शरीर पाहत आहात. हे तिच्या कठोर परिश्रमाचे फळ आहे. कियारा अडवाणीचा चित्रपट 'वॉर 2' 14 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. लोक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या






















