एक्स्प्लोर

Yogita Chavan : आधी मालिका अन् आता बिग बॉसचं घर गाजवणार, योगिता चव्हाणची कलर्स मराठीवर पुन्हा एकदा ग्रँड एन्ट्री

Yogita Chavan in Bigg Boss Marathi Season 5 : जीव माझा गुंतला फेम अभिनेत्री योगिता चव्हाणची एन्ट्री झाली आहे.

Yogita Chavan in Bigg Boss Marathi  Season 5 : अभिनेत्री योगिता चव्हाण (Yogita Chavan) ही कलर्स मराठी वाहिनीवरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर आता तिने बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi Season 5) ग्रँड एन्ट्री केली आहे. तिच्या एन्ट्रीमुळे चाहत्यांना देखील सुखद धक्का बसला आहे. तसेच पुन्हा एकदा कलर्स मराठी वाहिनीवर योगिताने एन्ट्री घेतली आहे. 

काही दिवसांपूर्वीच योगिताने तिचा सहकलाकार सौरभ चौघुलेसोबत लग्नगाठ बांधली होती. आता ती बिग बॉसच्या घरात कसा खेळ खेळणार याकडेही सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. तिचा खेळ पाहण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे. 

कोण आहे योगिता चव्हाण?

योगिता हा कलर्स मराठी वाहिनीवरील जीव माझा गुंतला या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यामध्ये तिने अंतरा ही भूमिका साकारली. तिची ही भूमिका देखील प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस उतरली होती. तिच्या या भूमिकेमुळे ती महाराष्ट्राच्या घरांघरात पोहचली.त्यानंतर ती राडा या सिनेमात देखील झळकली होती. आता ती बिग बॉसच्या घरातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

योगिताने बांधली लग्नगाठ 

 योगिता आणि सौरभ यांचा विवाहसोहळ 3 मार्च रोजी पार पडला. नातेवाईक आणि मित्र मैत्रीणींच्या उपस्थितीत योगिता आणि सौरभच्या लग्नसोहळा संपन्न झाला. योगिताने शेअर केलेल्या या फोटोवर अनेक कलाकार मंडळींनी देखील कमेंट्स करत त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. लग्नाला अवघे काही महिनेच झाले असताना योगिता आणि सौरभ या दोघांनी त्यांच्या हक्काचं नवं घरंही नुकतच खरेदी केलं आहे. 

रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार

काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस मराठी'चा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोवरुन रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आता रितेश स्पर्धकांची शाळा कशी घेणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. तसेच घरात कोणते टास्क होणार याचीही उत्सुकता आहे. कारण बिग बॉसची यंदाची थीम ही चक्रव्यूह अशी आहे. त्यामुळे स्पर्धक हे चक्रव्यूहात अडकणार आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Varsha Usgaonkar : बिग बॉस मी आले...! नाही नाही म्हणत वर्षा उसगांवकरांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केलीच

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: अजित पवारांची आई विठुरायाच्या दर्शनाला, दानपेटीत 500 रुपयांच्या कोऱ्या करकरीत नोटांचं बंडल टाकतानाच व्हिडीओ व्हायरल
अजित पवारांच्या आई विठुरायाच्या दानपेटीत पाचशेच्या नोटांचं बंडल टाकायला गेल्या पण शिरता शिरेना...
Walmik Karad : हत्येत नाव येताच वाल्मिक कराड नागपुरातून फरार झाला, 'त्या' महिलांच्या चौकशीत कोणती माहिती समोर आली? त्या महिलांशी काय संबंध??
हत्येत नाव येताच वाल्मिक कराड नागपुरातून फरार झाला, 'त्या' महिलांच्या चौकशीत कोणती माहिती समोर आली? त्या महिलांशी काय संबंध??
चार वर्षांपासून 'तारीख पे तारीख' चा खेळ सुरुच; यंदा तरी मरणासन्न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीला मुहूर्त लागणार?
चार वर्षांपासून 'तारीख पे तारीख' चा खेळ सुरुच; यंदा तरी मरणासन्न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीला मुहूर्त लागणार?
Astrology : नवीन वर्ष 3 राशींसाठी ठरणार खास; 1 जानेवारीपासून नशीब उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन वर्ष 3 राशींसाठी ठरणार खास; 1 जानेवारीपासून नशीब लखलखणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad on CID Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडीGautam Gambhir on India Performance : 'बस्स आता खूप...'; टीम इंडियाच्या पराभवानंतर गौतम गंभीर संतापलाRaj Thackeray On New Year: मराठी माणसावर, हिंदूंवर अन्याय झाल्यावर अंगावर येऊ, राज ठाकरेंची पोस्टMohan Bhagwat on Mandir : राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको : RSS Panchjanya

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: अजित पवारांची आई विठुरायाच्या दर्शनाला, दानपेटीत 500 रुपयांच्या कोऱ्या करकरीत नोटांचं बंडल टाकतानाच व्हिडीओ व्हायरल
अजित पवारांच्या आई विठुरायाच्या दानपेटीत पाचशेच्या नोटांचं बंडल टाकायला गेल्या पण शिरता शिरेना...
Walmik Karad : हत्येत नाव येताच वाल्मिक कराड नागपुरातून फरार झाला, 'त्या' महिलांच्या चौकशीत कोणती माहिती समोर आली? त्या महिलांशी काय संबंध??
हत्येत नाव येताच वाल्मिक कराड नागपुरातून फरार झाला, 'त्या' महिलांच्या चौकशीत कोणती माहिती समोर आली? त्या महिलांशी काय संबंध??
चार वर्षांपासून 'तारीख पे तारीख' चा खेळ सुरुच; यंदा तरी मरणासन्न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीला मुहूर्त लागणार?
चार वर्षांपासून 'तारीख पे तारीख' चा खेळ सुरुच; यंदा तरी मरणासन्न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीला मुहूर्त लागणार?
Astrology : नवीन वर्ष 3 राशींसाठी ठरणार खास; 1 जानेवारीपासून नशीब उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन वर्ष 3 राशींसाठी ठरणार खास; 1 जानेवारीपासून नशीब लखलखणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Suresh Dhas on Walmik Karad : अधिकाऱ्याला उचलून खंडणीचा गोरखधंदाच! तर वाल्मिक कराडमध्ये 302 मध्ये येऊ शकतो, सुरेश धसांनी वाचला बीडमधील कारनामांचा पाढा
अधिकाऱ्याला उचलून खंडणीचा गोरखधंदाच! तर वाल्मिक कराडमध्ये 302 मध्ये येऊ शकतो, सुरेश धसांनी वाचला बीडमधील कारनामांचा पाढा
Mhada Lottery: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या वर्षात 3000 सदनिकांची लॉटरी, कुठे असणार घरं?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या वर्षात 3000 सदनिकांची लॉटरी, कुठे असणार घरं?
Mamata Banerjee : बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
Datta Bharne on Dhananjay Munde : बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
Embed widget