Nikki Tamboli in Bigg Boss Marathi : अभिनेता रितेश देशमुखच्या (Ritiesh Deshmukh) ग्रँड एन्ट्री नंतर आता बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात स्पर्धकांची देखील एन्ट्री झाली आहे. यातील बऱ्याच स्पर्धकांच्या नावाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लागला असून यातील अनेक स्पर्धक बिग बॉसच्या घरात दाखल झाले आहे. त्यामुळे यंदाचा हा सिझन रितेशच्या स्टाईलने गाजणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालंय. घरात आतापर्यंत बरेच स्पर्धक दाखल झाले असून यामध्ये एका बोल्ड हसीनाचं देखील नाव आहे.
निक्की तांबोळी ही देखील बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहे. निक्कीच्या एन्ट्रीने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. त्याचप्रमाणे तिचे चाहते पुन्हा एकदा तिला बिग बॉसच्या घरात खेळताना पाहायला देखील उत्सुक आहे. कलर्स मराठी वाहिनीकडून स्पर्धकांचा नॉन रिव्हिलिंग प्रोमो शेअर करण्यात आला होता. त्यामधील एका प्रोमोवर अनेकांनी कमेंट्स करत निक्की तांबोळीचं नाव सुचवलं होतं. त्याचप्रमाणे आता निक्की बिग बॉसच्या घरात दाखल झालीये.
कोण आहे निक्की तांबोळी?
मराठमोळी निक्की तांबोळी ही सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते. निक्की ही बिग बॉस मराठीच्या 14 व्या सिझनमध्येही दिसली होती. त्यानंतर ती अनेक सेलिब्रेटींच्या म्युझिक अल्बममध्येही झळकली होती. तसेच तिचा कंचना-3 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. आता निक्की ही बिग बॉसच्या घरातही पाहायला मिळणार आहे.
रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार
काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस मराठी'चा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोवरुन रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आता रितेश स्पर्धकांची शाळा कशी घेणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. त्याचप्रमाणे आता 100 दिवस बिग बॉसच्या घरात काय काय होणार याचीही उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तसेच रितेश या सगळ्यांची शाळा घेतल्यानंतर स्पर्धकांचा खेळ कसा होणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल.