Irina Rudakova in Bigg Boss Marathi season 5 :  बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात परदेसी गर्लची एन्ट्री झाली आहे. परदेसी गर्ल नेमकी कोण असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. बिग बॉसच्या घरात इराना रोदाकोव्हाची ग्रँड एन्ट्री झाली आहे. तिच्या एन्ट्रीने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसलाय. 


सोशल मीडियावरुन इरीना ही प्रसिद्ध झाली. नुकतीच ती एका मराठी रॅप साँन्गमध्ये झळकली होती. त्यानंतर तिला मराठीतही चांगली प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे आता तिची बिग बॉस मराठीमध्ये एन्ट्री झाली आहे. पण ही इराना आहे तरी कोण हे सविस्तर जाणून घेऊयात.


इराना रोदाकोव्हा कोण?


इरा राय या नावाने तिचं सोशल मिडिया अकाऊंट आहे. सोशल मीडियावर तिचे जवळपास दीड लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. ती छोटी सरदारनी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तसेच ती आयपीएलमध्ये चिअर गर्ल म्हणून काम केलं आहे. इरीना ही टक्सिडो या मराठी रॅप सॉन्गमध्ये झळकली होती. त्यानंतर आता तिची बिग बॉसच्या घरात वर्णी लागली आहे. 


प्रत्येक आठवड्यात झटका आणि मनोरंजनाचा धमाका


मराठी मनोरंजनाचा बाप... ज्याची वाट अख्खा महाराष्ट्र बघतो... सुरु व्हायच्या आधीच ज्याच्या बद्दलच्या चर्चेला उधाण येतं, असा आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम 'बिग बॉस मराठी' अखेर सुरु झाला आहे. तारीख जाहीर झाल्याने यंदा स्पर्धक 'बिग बॉस मराठी'च्या घरात कशी धूम करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ‘बिग बॉस मराठी'चं बिगुल आता वाजलं आणि  स्पर्धकांच्या करामतींचा आता कस कसा लागेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. प्रत्येक आठवड्यात लागेल  झटका, आणि रंगणार मनोरंजनाचा धमाका. अशक्य अशा गोष्टींनी बनलेला 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी आता सज्ज आहे. घरातील मजा, मस्ती, डाव , प्रतिडाव आणि नव्या होस्टची कमाल अशा साऱ्याच गोष्टी पाहण्याची , अनुभवण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.  






ही बातमी वाचा : 


Ghanshyam Darade in Bigg Boss Marathi Season 5 : छोटा पुढारीची बिग बॉसच्या घरात 'मुसंडी', मोठा धमाका करण्यास स्पर्धक सज्ज!