एक्स्प्लोर

Welcome To The Jungle: 'वेलकम टू द जंगल'ची BOX ऑफिसवर ‘शंभरी’, 'अल्फा'लाही टाकलं मागे, 9 व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले?

Akshay Kumars Welcome To The Jungle: 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाने 9 दिवसांत 100 कोटींचा आकडा पार केला.

Welcome To The Jungle Crosses 100 Crore: अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'वेलकम टू द जंगल' (Welcome to the jungle) या सिनेमाने चित्रपटगृहांमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला. 9 दिवसांत या सिनेमानं 100 कोटींचा (Box Office collection) आकडा पार केला. या कॉमेडी अॅडव्हेंचर  सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे.  34 कलाकारांची फौज असलेल्या सिनेमाने ऑडियन्सला थिएटरपर्यंत  खेचण्यात यश मिळवले आहे.  शनिवारी म्हणजेच 9 व्या दिवशी या सिनेमाने उत्तम कामगिरी केली. आज रविवारीही हा सिनेमा उत्तम कामगिरी करु शकेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.  दरम्यान, या सिनेमाने 9 व्या दिवशी जबरदस्त कमाई करुन या सिनेमाने आलिया भट्टच्या  'अल्फा'ला पछाडलं.  या सिनेमाने शनिवारी नेमकं किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात. 

या सिनेमाने आतापर्यंत किती कोटींचे कलेक्शन केले आहे? (Welcome to the Jungle Box Office Collectio Day 9)

'वेलकम टू द जंगल' हा सिनेमा 26 जून रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाने पहिल्या दिवशी  15 कोटींचे कलेक्शन केले होते.  तर, पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 93 कोटींचे कलेक्शन केले आहे.   मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमाने शुक्रवारी 4.50 कोटींचे कलेक्शन केले. तर, शनिवारी या  सिनेमाने 7.35 कोटी रुपयांची कमाई केली.  एकूण 9 दिवसांत या सिनेमाने 100  कोटींचा आकडा पार केला.

'वेलकम टू द जंगल' या सिनेमाने एकूण 9 दिवसांत 105 कोटींचे कलेक्शन केले. आज रविवार असल्यामुळे हा सिनेमा आणखी कमाई करु शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.   मल्टीस्टारर हा सिनेमा आणखी किती कोटींचे कलेक्शन करेल? याची उत्सुकता  अक्षय कुमारच्या चाहत्यांना आहे.  वृत्तानुसार, या सिनेमाने त्याचे डिजिटल, संगीत आणि सॅटलाइट हक्क विकून आपला खर्च वसूल केलाय.  त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटींचे करेल? याची  मेकर्सना जास्त चिंता नाही.

दरम्यान, अक्षय कुमारने  या सिनेमासाठी कमी मानधन घेतले होते.  आता अक्षय कुमार चित्रपटाच्या प्रॉफिटमधून आपला वाटा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.  या सिनेमात 34 कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे.  अक्षय कुमार व्यतिरिक्त या सिनेमात  सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडीझ, रवीना टंडन, लारा दत्ता, राजपाल यादव यांसह इतर कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहे.  फिल्मच्या ओटीटी रिलीजबाबत माहिती समोर आली आहे,  हा सिनेमा जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होऊ शकते. पण याची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'ईठा' सिनेमाच्या टीमचा मोठा निर्णय, प्रदर्शनापूर्वी नारायणगावला देणार भेट, श्रद्धा कपूरही जाणार; विठाबाईंचे नातू म्हणाले...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
Aus vs Ban 2nd Test Mitchell Starc : मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
Ind vs Sl 2nd Test : पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Harshwardhan Sapkal: राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
Embed widget