Vishu Marathi Movie : दोन विभिन्न स्वभावाच्या व्यक्तींची हळुवार खुलत जाणारी प्रेमकहाणी आपल्याला 'विशू' मध्ये पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता 'विशू' चित्रपटातील 'रे मना' हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याला मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केलं असून या गाण्याला नेहा राजपाल हीच सुमधूर आवाज लाभला आहे. तर ह्रषिकेश कामेरकर यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. 'रे मना' हे गश्मीर महाजनी आणि मृण्मयी गोडबोले यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. या गाण्यात गश्मीर आणि मृण्मयी यांच्यातील अव्यक्त प्रेम नजरेनं व्यक्त करत आहेत. या गाण्याचं बोल अतिशय सुंदर असून प्रेमाच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देणारे हे गाणं आहे.
या गाण्याबद्दल चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे म्हणतात, "नकळत झालेल्या प्रेमाची जाणीव करून देणारं हे गाणं आहे. या गाण्यात गश्मीर आणि मृण्मयी प्रेमाची न बोलता कबुली देत आहेत. या गाण्यामुळे प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढेल. शहरी जीवनशैलीत वाढलेली आरवी जेव्हा गावातील लग्नातही तितकीच समरस होऊन जाते. इतकी मालवणची तिच्यावर जादू झाली आहे. कोकणातील लग्नघर कसे असते, याचेही या गाण्याच्या निमित्तानं दर्शन घडतंय''
श्री. कृपा प्रॉडक्शन्स प्रस्तुत बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटात गश्मीर महाजनी, मृण्मयी गोडबोलेसोबत ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरबक्शानी, प्रज्ञेश डिंगोरकरही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 'विशू' हा चित्रपट 8 एप्रिलपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Sandeep Pathak : मराठमोळ्या संदीप पाठकचा कॅनडामध्ये डंका, ‘राख' चित्रपटासाठी पटकावला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा पुरस्कार!
- PHOTO : नाकारून चुकलोच! आलिया भट्ट आधी ‘या’ अभिनेत्रींनाही ऑफर झाला होता ‘RRR’ चित्रपट!
- The Kapil Sharma Show : सुमोना चक्रवर्तीने ‘द कपिल शर्मा’ शो सोडला?
- Jada Pinkett, Will Smith : … जेडा पिंकेटने कापले केस! जाणून घ्या विल स्मिथच्या पत्नीला नेमका कोणता आजार झालाय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha