Jada Pinkett : ऑस्कर विजेता, हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ (Will Smith) याने ‘ऑस्कर 2022’च्या (Oscars 2022) कार्यक्रमात कॉमेडियन ख्रिस रॉकला (Chris Rock) सर्वांसमोर थप्पड लगावली, ज्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे. खरं तर, ख्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेटची (Jada Pinkett) तिच्या आजारावरून खिल्ली उडवली, जी विल स्मिथला आवडली नाही आणि त्याने स्टेजवर चढून ख्रिस रॉकला कानाखाली वाजवली. तुम्हाला माहीत आहे का, स्मिथची पत्नी जेडा पिंकेटला असा नेमका कोणता आजार आहे, ज्यामुळे विल स्मिथ इतका रागावला? चला जाणून घेऊया...


अभिनेता विल स्मिथची पत्‍नी जेडा पिंकेटला ‘अ‍लोपेशिया अरेटा’ (Alopecia Areata) नावाचा आजार आहे, जो एक कॉमन ऑटोइम्यून कंडिशन आहे. या आजारात रुग्णाचे केस गळायला लागतात आणि कधी कधी पूर्ण टक्कल पडते. तज्ज्ञांच्या मते, या आजारात पीडित व्यक्तीचे सर्व केस गळतात, तर कधी कधी संपूर्ण शरीरावरचे केस देखील गळतात.


Alopecia Areata म्हणजे काय?


विशेष म्हणजे, अ‍लोपेसिया अरेटा हा रोग कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकतो. माहितीनुसार, हा आजार 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये जास्त आढळतो. इतकेच नाही तर, हा रोग खूप वेगाने वाढतो. जेव्हा, हा रोग होतो, तेव्हा पीडित व्यक्तीचे केस वेगाने गळू लागतात. तज्ज्ञांच्या मते, जर एखाद्याला अ‍ॅलोपेसिया अरेटा या आजाराने ग्रासले असेल, तर त्यांच्या कुटुंबातील पाचपैकी किमान एकाला याचा त्रास होऊ शकतो.


कशामुळे होतो अलोपेसिया अरेटा?


अलोपेसिया अरेटा या रोगाचे मुख्य कारण तणाव आहे. मात्र, या साठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. जेव्हा एखाद्याला अलोपेसिया अरेटाचा त्रास होतो, तेव्हा डॉक्टर त्याला कॉर्टिकोस्टेरॉईड्ससारखे उपचार देतात जेणेकरून रुग्णाचे केस परत येऊ शकतील.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha