Sumona Chakravarti : ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) सध्या प्रचंड चर्चेत असतो. कॉमेडियन कपिल शर्माचा (Kapil Sharma) हा शो अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. अलीकडेच हा शो बंद होणार असल्याची बातमी समोर आली होती. आता अशी चर्चा सुरु झाली आहे की, अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti) हिने देखील या शोला अलविदा केला आहे. आता सुमोना चक्रवर्ती लवकरच एका बंगाली शोमध्ये दिसणार आहे. या शोचा प्रोमो समोर येताच लोक सुमोनाने शो सोडला अशी अटकळ बांधत आहेत. लोकांना असे वाटू लागले आहे की, सुमोना चक्रवर्ती कपिल शर्मा शो सोडून नवीन शोमध्ये सामील झाली आहे.


‘Zeezest’च्या Instagram अकाऊंटवर सुमोना चक्रवर्तीच्या नवीन शो ‘शोनार बंगाल’च्या प्रोमोची झलक दाखवली आहे. हा एक ट्रॅव्हल शो असणार आहे. सुमोना आता बंगालचे सौंदर्य जगासमोर आणणार असल्याचे या प्रोमोवरून स्पष्ट झाले आहे. या शोमध्ये रेट्रो आणि आधुनिक संस्कृतीचा मिलाफ पाहायला मिळणार आहे. सुमोनाचा हा नवीन शो 30 मार्चपासून रात्री 8 वाजता प्रसारित होणार आहे.


पाहा व्हिडीओ :



शोचा प्रोमो अप्रतिम आहे आणि लोक तो पाहण्यासाठी आतुर दिसत आहेत. प्रोमोवर एका व्यक्तीने कमेंट केली की, 'खूप इंटरेस्टिंग दिसत आहे... सुमोनाही खूप सुंदर दिसत आहे.' सुमोना चक्रवर्तीच्या नवीन शोचा प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


सुमोना चक्रवर्तीच्या नवीन शोचा प्रोमो समोर आल्यानंतर अभिनेत्री ‘द कपिल शर्मा शो’मधून बाहेर पडत असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे. मात्र, यावर कपिल शर्माची टीम आणि सुमोना चक्रवर्तीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. 


कपिल शर्मा शो बंद होणार असल्याची चर्चा!


नुकताच कपिलने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो शेअर करून, आपल्या यूएस-कॅनडा दौऱ्याची घोषणा केली आहे. या पोस्टनंतर सोशल मीडियावर कपिलचा शो लवकरच बंद होणार असल्याच्या चर्चा व्हायरल होऊ लागल्या. कपिलने अशा कोणत्याही बातमीला अधिकृत दुजोरा दिला नसला, तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार हा शो लवकरच ऑफ एअर होणार आहे. कपिल शर्मा शोचे निर्माते या शोचे प्रसारण बंद करणार आहेत. दुसरीकडे, कपिल शर्मा देखील त्याच्या कॉमेडी शोमधून थोडा ब्रेक घेईल आणि त्याच्या इतर व्यावसायिक कमिटमेंट्स पूर्ण करून लवकरच परतणार आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha