Hrithik Roshan As Vedha : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा आज 48 वा वाढदिवस आहे. या निमित्त सोशल मिडीयावर हृतिकच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. त्याचबरोबर चाहत्यांना हृतिकच्या आगामी चित्रपटाची उत्सुकतादेखील आहे. लवकरच हृतिक रोशनचा 'विक्रम वेधा'(Vikram Vedha)हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात हृतिक सैफ अली खान बरोबर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. वाढदिवसानिमित्त वेधाचा फर्स्ट लूक शेअर करत हृतिकने चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे. या चित्रपटातील हृतिकचा लूक पाहून चाहते फारच उत्सुक झाले आहेत. बहुप्रतिक्षित विक्रम वेधा हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. 


हृतिकने शेअर केला'वेधा'चा फर्स्ट लूक :


या चित्रपटात हृतिकचा लूक फारच डॅशिंग दिसतोय. या फोटोत हृतिक निळ्या कुर्त्यात दिसून येतोय. वाढलेली दाढी आणि गॉगल लावून हृतिक खूपच हटके दिसतोय. हृतिकने हा फोटो सोशल मिडीयावर शेअर करत 'वेधा' असं कॅप्शन दिलं आहे. 


चाहत्यांना आवडला हृतिकचा लूक :
हतिकचा वेधा चित्रपटातील लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे. या फोटोला चाहत्यांकडून शुभेच्छादेखील मिळतायत. हृतिकच्या या पोस्टला काही मिनिटांतच 3 लाखांहून अधिक लोकांनी लाईकदेखील केले आहे. 


आगामी चित्रपट विक्रम वेधा हा मूळ तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात हृतिक गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसणारआहे तर दुसरी महत्वाची भूमिका साकारणारा अभिनेता सैफ अली खान पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. याचबरोबर या चित्रपटात राधिका आपटेदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सुरुवातीला या चित्रपटासाठी आमिर खानला विचारण्यात आले होते पण आता हृतिक रोशन ही भूमिका साकारणार आहे. 
याचबरोबर नवीन वर्षात हृतिकचे आगामी काही चित्रपटही रिलीज होणार आहेत. यामध्ये 'फायटर' या सिनेमात हृतिक अभिनेत्री दिपिका पादुकोणसह दिसणार आहे. त्याचबरोबर क्रिश 4 ची शूटिंगही सुरु आहे. 


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


[yt][/yt]