WTC Points Table: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सिडनी येथे खेळलेला अॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं 3-0 अशी आघाडी घेतली. पण, सिडनी कसोटी अनिर्णित राहिल्यामुळं जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) गुणतालिकेत मोठा बदल झालाय. डब्लूटीसीच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झालीय. तर, श्रीलंकानं पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. श्रीलंकेचा संघ 100 टक्के, तर ऑस्ट्रेलियाचा संघ 83.33 टक्के विजयी झाला.


श्रीलंकेचे 24 आणि ऑस्ट्रेलियाचे 40 गुण आहेत. पाकिस्तानचा संघ 35 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानची विजयाची टक्केवारी 75 टक्के आहे. पाकिस्ताननं आतापर्यंत दोन मालिका खेळल्या आहेत. यापैकी तीन सामन्यात पाकिस्ताननं विजय मिळवलाय. तर, एका सामन्यात पराभव स्वीकारला लागलाय.


डब्लूटीसी पॉईंट टेबल-



न्यूझीलंड संघ डब्लूटीसी 2023 मध्ये आपली दुसरी मालिका खेळत आहे. त्यांनी दोन सामने गमावले आणि एक अनिर्णित राहिला. न्यूझीलंडचा संघ अजूनही पहिल्या विजयाच्या शोधात आहे. न्यूझीलंडचे एकूण 4 गुण आहेत. त्यांची विजयाची टक्केवारी 11.11 इतकी आहे. न्यूझीलंडचा संघ सातव्या क्रमांकावर आहे. नुकताच न्यूझीलंडचा पराभव करणारा बांगलादेश सहाव्या स्थानावर आहे. बांगलादेशची विजयाची टक्केवारी 33.33 इतकी आहे.


भारताचा क्रमांक कितवा?
जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा सात विकेट्स राखून पराभव केला. या विजयाचा फायदा दक्षिण आफ्रिकेला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही झाला. या विजयामुळं दक्षिण आफ्रिकेनं दहाव्या स्थानावर पाचव्या क्रमांकावर झेप घेतलीय. 


दक्षिण आफ्रिकेचे गुण
दक्षिण आफ्रिका डब्लूटीसी 2023 मधील पहिली मालिका खेळत आहे. यापैकी एक सामना जिंकला आहे, तर एका सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय. 


भारताचे गुण
डब्लूटीसी 2023 मध्ये भारतानं आतापर्यंत एकूण नऊ सामने खेळळे आहेत. तसेच भारताची विजयाची टक्केवारी 55.21 इतकी आहे. भारतानं नऊ सामन्यांपैकी 4 सामने जिंकले आहेत. तर, दोन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. भारताचे सध्या 53 गुण आहेत. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha