Allu Arjun on Pushpa-2 : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. हा सिनेमा 7 जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाच्या धमाकेदार कमाईदरम्यान अल्लू अर्जुनने आता 'पुष्पा-2'बाबत मोठा खुलासा केला आहे.


'पुष्पा' सिनेमात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्या अभिनयाचेदेखील कौतुक होत आहे. पुष्पाचा पहिला भाग पाहिल्यानंतर प्रेक्षक आता सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान अल्लू अर्जुन म्हणाला की, लवकरच 'पुष्पा 2' सिनेमाचे शूटिंग सुरू होणार आहे.





एका मुलाखतीदरम्यान अल्लू अर्जुन म्हणाला, दोन महिन्यांनंतर 'पुष्पा-2' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. 'पुष्पा-1' ते 'पुष्पा-2' दरम्यान 30-40 दिवसांचा ब्रेक घेत आहे. पुष्पा च्या दुसऱ्या भागाविषयी अल्लू म्हणाला,"पुष्पा च्या पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग अधिक आव्हानात्मक आहे". 


अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या पुष्पा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 74.44 कोटींची कमाई केली आहे. यासोबतच अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाल्यानंतरही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 7 जानेवारी रोजी हा सिनेमा ओटीटीवर तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. तर लवकरच हिंदी भाषेतदेखील प्रदर्शित होणार आहे. 


संबंधित बातम्या


Best 5 Psychological Thriller Movies : आवर्जून पाहावेत असे सायकोलॉजिकल थ्रिलर टॉप 5 सिनेमे!


OTT Releases in January : या महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार 'हे' सिनेमे आणि वेबसीरिज


Chandigarh Kare Aashiqui on OTT : आयुष्मान खुरानाचा 'चंदीगड करे आशिकी' आता प्रेक्षकांना पाहता येणार नेटफ्लिक्सवर


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha