Hrithik Roshan Birthday:  : आपल्या स्टाईलने आणि डान्सने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवणारा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ह्रतिक रोशनचा (Hrithik Roshan) आज 48 वा वाढदिवस आहे. ह्रतिकच्या वाढदिवसाला त्याच्या कुटुंबात एका नव्या पाहुण्यानं एन्ट्री केली आहे. ह्रतिकने एक खास पोस्ट शेअर करून या पाहुण्याचे त्याच्या कुटुंबात स्वागत केले आहे. 


ह्रतिकच्या या पाहुण्याचं नाव मोगली असं आहे. हे छोटे कुत्र्याचं पिल्लू असून ह्रतिकने मोगलीचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.  व्हिडीओ शेअर करून ह्रतिकने कॅप्शनमध्ये लिहिले, 'हा मोगली आहे. हा मला एका कार खाली सापडला आहे'. मोगलीला ह्रतिकने दत्तक घेतला आहे, असं या पोस्टमधून लक्षात येतं. मोगलीच्या व्हिडीओला ह्रतिकने अॅडोपटेड असा हॅशटॅग दिला आहे. ह्रतिकच्या या पोस्टवर अभिनेत्री प्रियांका चोप्रानं कमेंट केली, 'ह्रतिक तु खूप चांगला निर्णय घेतला आहेस. हाय मोगली.' तसेच दिग्दर्शक जोया अख्तरने देखील ह्रतिकच्या या व्हिडीओला कमेंट केली आहे. 






संबंधित बातम्या


कभी खुशी कभी गम,कोई मिल गया,धूम 2 आणि कहो ना प्यार है या ह्रतिकच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. काही दिवसांपूर्वी अभिनेता ऋतिक रोशनने जुहू वर्सोवा लिंक रोड येथे तीन पेंट हाऊस खरेदी केले आहेत. या पेंट हाऊसची किंमत जवळपास 100 कोटी रूपये आहे. 


OTT Releases in January : या महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार 'हे' सिनेमे आणि वेबसीरिज


Baahubali Fame Kattappa Health: महेश बाबूनंतर बाहुबली फेम कट्टप्पा झाले रूग्णालयात दाखल, काही दिवसांपूर्वीच झालेली कोरोनाची लागण