Hrithik Roshan's Upcoming Film : ऋतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सचा एक भाग आहे. त्यापैकी एक म्हणजे 'विक्रम वेधा' (Vikram Vedha). या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत गाजलेला हा चित्रपट आता हिंदीत बनवला जात आहे. प्रेक्षकांना या सिनेमाबद्दल खूप उत्सुकता आहे. आता ऋतिकच्या चाहत्यांना एक सरप्राईज मिळणार आहे. ऋतिकच्या वाढदिवसानिमित्त विक्रम वेधमधील त्याचा पहिला लूक समोर येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.






10 जानेवारी म्हणजेच सोमवारी ऋतिकचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्याच्या बहुचर्चित 'विक्रम वेधा' सिनेमातील त्याचा लूक सोशल मीडियावर प्रदर्शित केला जाणार आहे. सिनेमातील ऋतिकचा लूक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.





 ऋतिक साकारतोय खलनायकाची व्यक्तिरेखा 
'विक्रम वेधा' सिनेमात ऋतिक वेधाची भूमिका साकारत आहे. सिनेमात ऋतिक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधीही तो धूम सीरिजमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटात ऋतिक रोशनसोबत सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 


संबंधित बातम्या


Allu Arjun on Pushpa -The Rule : अल्लू अर्जुनने केला खुलासा, 'या' दिवशी सुरू होणार 'पुष्पा 2' चे चित्रीकरण


Vicky Katrina One Month Anniversary: कतरिना आणि विकीच्या लग्नाला पूर्ण झाला 1 महिना, मिसेस कौशलने खास अंदाजात दिल्या पती विकीला शुभेच्छा !


OTT Releases in January : या महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार 'हे' सिनेमे आणि वेबसीरिज


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha