कधीकाळी जवळ फक्त 18 रुपये, आज सर्वाधिक सुंदर अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड, कोट्यधीश असलेला 'हा' हिरो आहे तरी कोण?
कधीकाळी या अभिनेत्याच्या बँक खात्यात फक्त 18 रुपये शिल्लक राहिले होते. अशा कठीण काळातून गेल्यानंतर आज तो कोट्यधीश आहे. एका चित्रपटासाठी तो आज कोट्यवधी रुपये घेतो.

Actor Vijay Varma: बॉलिवुड हे असे क्षेत्र आहे, जिथं रोज अनेकजण नशीब आजमावण्यासाठी येतात. यात काही जणांना यश येतं तर काही जण निराशा पदरात घेऊन निघून जातात. मात्र असाच एक अभिनेता आहे, ज्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवुडमध्ये वेगळं स्थान मिळवलंय. करिअर घडवण्यासाठी तो कधीकाळी घरातून पळून आला होता. कठीण काळात असताना त्याच्या खिशात फक्त 18 रुपये होते. आता मात्र हा अभिनेता कोट्याधीश आहे. सोबतच एका चित्रपटासाठी तो कित्येक लाख रुपये फी घेतो. या अभिनेत्याचं नाव आहे विजय वर्मा.
वडील झाले होते नाराज
विजय वर्मा मुळचा हैदराबादचा आहे. त्याचे वडील एक उद्योजक आहेत. त्याच्या वडिलांना वाटायचे की माझ्या मुलाने भविष्यात उद्योग सांभाळावा. मात्र विजय वर्माच्या मनात वेगळंच काही होतं. त्याने सगळं सोडून अभिनय क्षेत्रात उडी घेतली आणि आज तो एक यशस्वी अभिनेता म्हणून नावारुपाला आला आहे.
घरातून पळून गेला होता विजय
विजयने अभिनय क्षेत्रात करिअर करताना त्याचे सुरुवातीचे दिवस कसे होते, याबाबत सविस्तर सांगितलं आहे. "मी माझ्या घरात सर्वांत लहान मुलगा होता. त्यामुळेच सगळा घोळ झाला. मी स्वतंत्रपणे विचार करायला लागलो होतो. मला अभिनय करायचा आहे, असं घरच्यांना सांगितलं. पण माझे वडील त्यासाठी तयार नव्हते. माझ्या मुलाने माझा उद्योग सांभाळावा, असे त्यांना वाटायचे. ते त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. मिही माझ्या भूमिकेवर ठाम होतो. त्यानंतर मी घरातून बाहेर पडलो. सात ते आठ वर्षे माझा संघर्ष चालू होता. या काळात माझे घरच्यांशी बोलणे झाले नाही," अशी माहिती विजय वर्माने दिलेली आहे.
विजयच्या खिशात होते फक्त 18 रुपये
विजय वर्माला पहिला चित्रपट मिळवण्यासाठी खूप सारे प्रयत्न करावे लागले. त्याला 2010 साली पहिला चित्रपट मिळाला. या चित्रपटाचे नाव चटगांव असे होते. त्या काळात विजय वर्माकडे पैसे नव्हते. त्यामुळेच जी भूमिका मिळेल ती करायची, असे त्याने ठरवले होते. याबाबत बोलताना "त्या काळात मी अत्यंत कठीण काळातून जात होतो. तेव्हा माझ्याजवळ पैसे नव्हते. माझ्या बँक खात्यात फक्त 18 रुपये होते. त्याच काळात मला एक कॉल आला आणि एका रिपोर्टरचा रोल आहे, करशील का असं विचारण्यात आले. त्यासाठी मला 3000 रुपये मिळतील असे सांगण्यात आले. मला एवढी छोटी भूमिका करायची नव्हती. मात्र माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता," असेही विजय वर्माने सांगितले.
आज विजय वर्माची संपत्ती 20 कोटी रुपये
विजय वर्माने ही भूमिका करण्याचे ठरवले. मात्र त्यानंतर त्याची खरी फजिती झाली. कारण हे पात्र इंग्रजित बोलणारे होते. विजय वर्माला इंग्रजीत अभिनय करणे अवघड जात होते. शेवटी त्याला सेटवरून हाकलून देण्यात आले. त्यानंतर मी पैशांसाठी काहीही करणार नाही, असे त्याने ठरवले. आज मात्र विजय वर्मा हा नामांकित अभिनेता आहे. त्याची एकूण संपत्ती आजघडीला 20 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. आज तो एका चित्रपटासाठी 80 लाख ते 1 कोटी रुपये घेतो.
हेही वाचा :
कधीकाळी बॉलिवुड गाजवलं, आता अज्ञातवासात, हजारो चाहते असणारी 'ही' हिरोईन आता नेमकं करते तरी काय?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
