एक्स्प्लोर

Actor Death: मनोरंजन विश्वावर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, चित्रपट अन् 17हून अधिक मालिकांमध्ये काम

Veteran Bengali actor Biplab Dasgupta: बिप्लव दासगुप्ता यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले.

Biplab Dasgupta Death: 'गुमनामी' आणि 'जुल्फिकार' सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन (Entertainment) करणारे दिग्गज बंगाली अभिनेते बिप्लव दासगुप्ता (Biplab Dasgupta) यांचं निधन झालं आहे.  वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कौटुंबिक सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेनंतर दासगुप्ता यांना काही काळापासून  आरोग्याच्या समस्या जाणवत होत्या. शुक्रवारी टॉलीगंज स्थित गोल्फ कल्ब रोड येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर दासगुप्ता यांना रुग्णालयात पाठवण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. दासगुप्ता यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.

दासगुप्ता यांनी आपल्या कारकि‍र्दीत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं. दासगुप्ता यांनी 'केमिस्ट्री मासी', 'जगमाया'  आणि 'चेकमेट' यांसारख्या मालिकांमध्ये काम करुन आपल्या अभिनयाची छाप सोडली.

17 हून अधिक मालिकांमध्ये काम (Bengali Cinema Mourns Loss of Actor Biplab Dasgupta)

 बिप्लव दासगुप्ता हे बंगाली चित्रपट आणि दुरदर्शनमधील एक सुप्रसिद्ध अभिनेते होते.  त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत उत्कृष्ट भूमिकांमधून अभिनयाचे कौशल्य दाखवले.   बऱ्याच काळापासून बिप्लव दासगुप्ता हे बंगाली सिनेसृष्टीचे भाग आहेत. ते पहिल्यांदा  1998 साली प्रदर्शित झालेल्या 'द बंगाली नाईट' या प्रोजेक्टमधून इंडस्ट्रीतल पाऊल ठेवलं. त्यानंतर 1996 साली   'कहिनी' या सिरिअलमध्येही काम केलं.  त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत अनेक बंगाली चित्रपटात काम करुन आपलं नाव गाजवलं. 

बंगाली सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर (Veteran Bengali actor Biplab Dasgupta Death)

बंगाली चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकारांनी बिप्लव दासगुप्ता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. बिप्लव दासगुप्ता यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या कुटुंबाने त्यांची काळजी घेतली होती. ते बऱ्याच काळापासून आजारी होते.  कोलकाता चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी दासगुप्ता यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून, कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. दासगुप्ता कुटुंबावरही दु:खाचा डोंगर कोसळला असून, बंगाली सिनेसृष्टीतूनही शोक व्यक्त केले जात आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये मोठा ट्विस्ट; बापूजींचा मृत्यू झाला? जेठालालचं रडू थांबेना

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
Kala Hiran The Battle for Legacy: हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
Kiran Rao Supports Sonam Wangchuk: आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
Adinath Kothare And Urmila Kanetkar Net Worth: आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?
आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
Embed widget