एक्स्प्लोर

Tumbadachi Manjula Song Rahul Deshpande Aarya Ambekar: राहुल देशपांडे आणि आर्या आंबेकरच्या सुरांतून होणार आगळ्या वेगळ्या गावाचं दर्शन; 'तुंबाडची मंजुळा'मधील पहिलं गाणं प्रदर्शित

Tumbadachi Manjula Song Rahul Deshpande Aarya Ambekar: राहुल देशपांडे, आर्या आंबेकर या दोघांच्या आवाजातील भावपूर्णता आणि सहजता गाण्याला एक वेगळीच उंची देते. या गाण्याच्या निमित्ताने ही दोन नावे प्रथमच एकत्र आली असून त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये या गाण्याबद्दलची उत्कंठा वाढली आहे.   

Tumbadachi Manjula Song Rahul Deshpande Aarya Ambekar: झी स्टुडिओज (Zee Studios) निर्मित 'तुंबाडची मंजुळा' (Tumbadchi Manjula) या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. टीझरमधील गावकऱ्यांची हटके झलक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. या गावात नेमकं काय वेगळं आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झालेली असतानाच आता चित्रपटातील ‘असं वेगळं गाव’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याचं वैशिष्ट्यं म्हणजे शास्त्रीय आणि सुगम संगीतातील सुप्रसिद्ध नाव राहुल देशपांडे (Rahul Deshpande) आणि गोड गळ्याची गायिका आर्या आंबेकर (Aarya Ambekar) यांच्या सुरांतून या गावाचं दर्शन होणार आहे. या दोघांच्या आवाजातील भावपूर्णता आणि सहजता गाण्याला एक वेगळीच उंची देते. या गाण्याच्या निमित्ताने ही दोन नावे प्रथमच एकत्र आली असून त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये या गाण्याबद्दलची उत्कंठा वाढली आहे.   

गाण्याबद्दल राहुल देशपांडे म्हणतात, "तुंबाडची मंजुळा' या चित्रपटामधील हे एक अतिशय फ्रेश आणि वेगळ्या धाटणीचं गाणं गाण्याची संधी मला मिळाली, याचा मला खूप आनंद आहे. या गाण्याचं संगीत अत्यंत आधुनिक असूनही त्यात गावाकडचा गंध सुंदरपणे जपला आहे, ही त्याची खासियत आहे. याचे शब्द आणि चाल ही आजच्या काळाशी सुसंगत अशीच असून मला खात्री आहे की, हे गाणं प्रेक्षकांना नक्की आवडेल..."  

आर्या आंबेकर म्हणते, "हे गाणं गावाची एक सुंदर, मनाला भिडणारी गोष्ट सांगते. अशा प्रकारचं वेगळ्या धाटणीचं गाणं मी पहिल्यांदाच गात असून प्रेक्षक जेव्हा चित्रपटात हे गाणं पाहातील आणि ऐकतील तेव्हा त्यांना चित्रपटाचं बॅकग्राउंड आणि संगीत किती वेगळ्या पद्धतीचे आणि खास आहे हे जाणवेल."

असं वेगळं गाव’ हे गाणं गावकऱ्यांच्या अतरंगी आणि सतरंगी स्वभावाची अत्यंत रंगतदार आणि मनमोहक झलक सादर करतं. गुण्यागोविंदाने नांदणारं, आपुलकीने बांधलेलं आणि आनंदाने बहरलेलं गाव या गाण्यातून जिवंत होतं. गावातील प्रत्येक व्यक्तिरेखा, त्यांची वेगळी ढब, त्यांची मस्ती, त्यांच्या नात्यांमधील ऊब आणि एकमेकांबद्दलचं निखळ प्रेम या सगळ्यांचा सुरेल संगम या गाण्यात अनुभवायला मिळतो. हे गाणं मातीशी घट्ट जोडलेलं, गावकुसातील जीवनाचं प्रतिबिंब दाखवणारं आहे. कोकणातील निसर्गरम्य लोकेशन्सवर या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं असून, हिरवाईने नटलेला परिसर, आणि गावातील साधेपणाचं सौंदर्य या गाण्यातून अत्यंत प्रभावीपणे टिपण्यात आलं आहे. विक्रम एडके यांचे शब्द असलेल्या या गाण्याला असीम कुऱ्हेकर, प्रतीक केळकर आणि तेजस जोशी या संगीतकार त्रयींनी संगीतबद्ध केलं आहे.

झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, "हे गाणं या चित्रपटाचा आणि त्यातील व्यक्तिरेखांचा सूर निश्चित करणारं आहे. हे गाणं जरी कोकणातील गावावार चित्रीत झालं असलं तरी प्रत्येक भागातील प्रेक्षकाला ते आपल्या मातीशी आणि आठवणींशी जोडणारं वाटेल. राहूल देशपांडे आणि आर्या आंबेकर यांच्या जादूई सुराने सजलेलं हे गाणं संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल."

ऋषिकेश तुरई यांचे लेखन असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विविध कोरगांवकर यांनी केले असून यात जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, रीलस्टार अथर्व रुके, नवोदित अभिनेत्री प्रियल नाईक आणि उषा नाडकर्णी हे कलाकार पाहायला मिळतील. झी स्टुडिओजच्या उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या 5 जून रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'तुंबाडची मंजुळा' सिनेमातलं गाणं ऐकलंत?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date Update: रणबीर कपूरच्या 'रामायण' रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट; 'या' हॉलिवूड सिनेमाशी बॉक्स ऑफिस क्लॅश?
रणबीर कपूरच्या 'रामायण' रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट; 'या' हॉलिवूड सिनेमाशी बॉक्स ऑफिस क्लॅश?
Kushal Badrike On Rahul Deshpande: भाऊ कदमांनी 'तो' प्रश्न विचारताच राहुल देशपाडेंना राग अनावर, अन्...; कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा 'तो' किस्सा
भाऊ कदमांनी 'तो' प्रश्न विचारताच राहुल देशपाडेंना राग अनावर, अन्...; कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा 'तो' किस्सा
Elvish Yadav on CJP protest: 'ना मी BJP समर्थक ना...', CJP आंदोलनावर एल्विश यादवची प्रतिक्रिया चर्चेत, नेटकरी भडकले; इन्फ्ल्युएंसरची घेतली शाळा
'ना मी BJP समर्थक ना...', CJP आंदोलनावर एल्विश यादवची प्रतिक्रिया चर्चेत, नेटकरी भडकले; इन्फ्ल्युएंसरची घेतली शाळा
सोनम वांगचूक यांच्या आंदोलनादरम्यान '3 इडियट्स'ची पुन्हा एंट्री; कधी रिलीज होणार आमिर खानचा गाजलेला चित्रपट?
सोनम वांगचूक यांच्या आंदोलनादरम्यान '3 इडियट्स'ची पुन्हा एंट्री; कधी रिलीज होणार आमिर खानचा गाजलेला चित्रपट?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
Maharashtra Weather Update: मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
CJP Protest in Mumbai : CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Raj Thackeray on Delhi LathiCharge: दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Embed widget