एक्स्प्लोर

Trisha Krishnan Relationship Rumors Thalapathy Vijay: तृषा कृष्णनने अजूनही लग्न का केलं नाही? बड्या उद्योगपतीसोबत मोडलेला साखरपुडा, राणा दग्गुबातीसोबत अफेअरच्या चर्चा अन् आता मुख्यमंत्र्यांची प्रेयसी

Trisha Krishnan Relationship Rumors Thalapathy Vijay: थलपती विजय शपथ घेताना तृषा काहीशी भावूकही झाली. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चांना उधाण आलं. 

Trisha Krishnan Relationship Rumors Thalapathy Vijay: साऊथची सुपरस्टार (South Superstar) अभिनेत्री तृषा कृष्णन (Trisha Krishnan) सध्या तिच्या सिनेमांपेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय (Tamil Nadu CM Thalapathy Vijay) यांच्यासोबतच्या कथित अफेअर आणि लग्नाच्या चर्चांमुळे सध्या ती भलतीच चर्चेत आली आहे. त्यातच भरीस भर म्हणून  नुकत्याच पार पडलेल्या थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात तृषा कृष्णन (Actress Trisha Krishnan) पारंपरिक साजात मिरवताना दिसली. या सोहळ्यात तिनं थलपती विजय यांच्या आई आणि बहिणीला कडकडून मिठी मारली. थलपती विजय शपथ घेताना तृषा काहीशी भावूकही झाली. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चांना उधाण आलं. 

43 वर्षांच्या तृषा कृष्णन हिनं अद्याप लग्न केलेलं नाही. मात्र, यापूर्वी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आलेली. 2015 मध्ये करिअरच्या शिखरावर असतानाही तिनं चेन्नईतील उद्योगपती वरुण मनियन यांच्याशी साखरपुडा उरकला होता. त्यावेळी चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. पण, फक्त पाचच महिन्यांत उद्योगपती वरुण मनियन यांच्याशी तिंच नातं तुटलं आणि साखरपुडा मोडला. नेमकं कारण काय? काय घडलं? कुणालाच काही ठाऊक नाही. 

साखरपुडा मोडल्यानंतर मात्र, तृषानं त्याबाबत कोणतीही वाच्यता केली नव्हती. त्यानंतर 2017 मध्ये तृषानं एका मुलाखतीत लग्नाबबात आपलं मत व्यक्त केलं. "मला लग्न संस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पण केवळ समाजाचा दबाव किंवा वाढतं वय यामुळे लग्न करायचं नाही. प्रेम आणि भावनिक जुळवाजुळव असेल, तेव्हाच लग्न व्हायला हवं...", असं तृषा कृष्णन हिनं म्हटलेलं. 

राणा दग्गुबातीसोबत जोडलं गेलं नाव (Trisha Krishnan Rana Daggubati Linkup)

याशिवाय, तृषा कृष्णन हिचं नाव राणा दग्गुबाती याच्याशीही जोडलं गेलेलं. या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला. तृषासोबतचा साखरपुडा तुटल्यानंतर, तिच्या आणि राणा यांच्यातील कथित प्रेमसंबंधांची बरीच चर्चा सुरू झाली. दरम्यान, या दोघांपैकी कोणीही आपल्या नात्याला कधीही अधिकृत दुजोरा दिला नाही. या चर्चांच्या गदारोळातच, सोशल मीडियावर एक असा फोटो समोर आला, ज्यामध्ये राणा दुगुबत्तीला तृषा किस करताना दिसत होती. तरीही, 2018 मध्ये करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात सहभागी झाला असताना, राणानं हे कबूल केलं की, त्यानं त्या अभिनेत्रीसोबत खरोखरंच काही काळासाठी प्रेमसंबंध ठेवले होते, पण कालांतरानं दोघेही वेगळे झाले.

आता थलपती विजयसोबत अफेअरच्या चर्चा (Trisha Krishnan Thalapathy Vijay)

आता तृषा कृष्णन हिचं नाव तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्यासोबत जोडलं जात असल्यानं त्यांच्या कथित अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. 2023 मध्ये जवळपास 15 वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसली होती. लिओ या सिनेमातून दोघांनी एकत्र काम केलं आणि चाहत्यांकडून त्यांच्या केमिस्ट्रीचं भरभरून कौतुक झालं. यानंतर SIIMA पुरस्कार सोहळ्यात तृषानं विजय यांच्या नव्या राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. "त्यांनी पाहिलेली प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावीत...", असं ती म्हणाली होती. त्यानंतर दोघे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसू लागले. याचदरम्यान विजय यांच्या पत्नीनं कथित एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबाबत केलेल्या आरोपांमुळे चर्चांना आणखी खतपाणी मिळालं आणि सोशल मीडियावर तृषा-विजय यांच्या नात्याबाबत तर्कवितर्क सुरू झाले.

लग्नाबाबत काय म्हणाली, तृषा कृष्णन? (Trisha Krishnan Net Worth)

लग्नाबाबत बोलताना तृषा कृष्णन हिनं आपल्या स्पष्ट विचारांमुळे अनेकांचं लक्ष वेधलं होतं. इंडिया ग्लिट्जला दिलेल्या मुलाखतीत तिनं सांगितलेलं की, "मी नेमकं कधी लग्न करेन हे मला माहीत नाही. कारण ते पूर्णपणे माझ्यासोबत कोण आहे आणि मला त्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवायचं आहे का? यावर अवलंबून आहे. मला अशी भावना यायला हवी की, मी या व्यक्तीसोबत संपूर्ण आयुष्य आनंदानं घालवू शकते. तेव्हाच मी लग्न करेन..."

तिनं पुढे म्हटलं होतं की, "माझा घटस्फोटावर विश्वास नाही. लग्नानंतर नातं तुटावं, असं मला वाटत नाही. माझ्या आसपास अनेक जोडपी आहेत, ज्यांची लग्नं मोडली आहेत, तर काही जण त्यांच्या संसारात खूप आनंदी आहेत. त्यामुळे मला योग्य व्यक्ती भेटेल आणि त्या नात्यात मी खरोखर आनंदी असेन, तेव्हाच मी लग्न करेन... आणि जर तसं झालं नाही, तरी मी एकटीही आनंदात आहे..."

दरम्यान, तृषा कृष्णन हिच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं, तिचा आणि अभिनेता सूर्याचा 'करुप्पू' सिनेमा चर्चेत आहे. हा सिनेमा 14 मे रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात आला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Trisha Krishnan First Post After Thalapathy Vijay CM: थलपती विजय मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तृषा कृष्णन हिची पहिली पोस्ट; म्हणाली, 'प्रेम नेहमीच...'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
Yashpal Sharma on Ladoo: 'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
Salman Khan on Pradeep Rawat: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget